Anna Bansode Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Anna Bansode Solapur Tour : राष्ट्रवादीच्या अण्णा बनसोडेंनी दक्षिण सोलापूरमध्ये लावली फिल्डिंग; अजितदादा काँग्रेस, भाजपला धक्का देणार

NCP News : दक्षिण सोलापूर तालुक्यातील नगरसेवक, सरपंच, उपसरपंच आणि काँग्रेसचे पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. त्याची आढावा बैठक घेऊन त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी मी सोलापूरच्या दौऱ्यावर आलो होतो.

Vijaykumar Dudhale, विश्वभूषण लिमये

Solapur, 21 June : दक्षिण सोलापूर तालुक्यातील २० ते २२ सरपंच, उपसरपंच, नगरसेवक आणि काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. याबाबतची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार तथा विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिली. त्या दृष्टीने आज बैठकही झाली. त्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी नगरसेवक, सरपंच आणि उपसरपंच यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. त्यामुळे अजितदादा दक्षिण सोलापूरमध्ये भाजप आणि काँग्रेसला धक्का देण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे (Anna Bansode) हे आज सोलापूरच्या दौऱ्यावर आले होते. त्या वेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होणाऱ्या प्रवेशाबाबत माहिती दिली. ते म्हणाले, दक्षिण सोलापूर तालुक्यातील नगरसेवक, सरपंच, उपसरपंच आणि काँग्रेसचे पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. त्याची आढावा बैठक घेऊन त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी मी सोलापूरच्या दौऱ्यावर आलो होतो. त्याबाबतची आढावा बैठक झाली, त्या बैठकीला अजितदादा पवार यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला.

अजित पवारांनी (Ajit Pawar) सांगितले आहे की, तुम्ही राष्ट्रवादीत प्रवेश केला तर आम्ही तुमच्या पाठीमागे भक्कम उभे राहू. महायुतीसोबत असलो तरी पुरोगामी विचारांचा पगडा आमच्यावर आहे. तो विचार न सोडता महाराष्ट्राच्या विकासासाठी आम्ही महायुतीमध्ये सामील झालो आहोत. आज झालेल्या बैठकीला 20 ते 22 सरपंच उपसरपंच उपस्थित होते.

रायगडच्या पालकमंत्रिपदाबाबत मी बोलणं उचित होणार नाही. पालकमंत्र्यांचा निर्णय युतीमधील तीनही नेत्यांच्या विचारनेच होणार आहे. फडणवीस, शिंदे आणि अजितदादा ठरवतील तेच रायगड आणि नाशिकचे पालकमंत्री होतील. युतीतील तिन्ही पक्षातील नेते जो निर्णय घेतील, तो गोगावले किंवा आदिती तटकरे यांना मान्य असेल, असेही बनसोडे यांनी स्पष्ट केले.

अजित पवार हे मुख्यमंत्री व्हावेत, अशी राज्यातील जनतेची इच्छा आहे, त्या दृष्टीने अमोल मिटकरींनी ते वक्तव्य केलं आहे. मी अजित पवारांचा एकनिष्ठ कार्यकर्ता आहे. शंभर टक्के माझंही तेच मत असणार आहे. अजितदादा पवारच म्हणाले होते, प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं त्याच्या पक्षाचा नेता मुख्यमंत्री व्हावा, तसं आम्हालाही वाटतं, असेही बनसोडेंनी स्पष्ट केले.

अण्णा बनसोडे म्हणाले, ज्या पक्षाचे सर्वात जास्त आमदार निवडून येतील. त्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल, असं अजित पवारांचे विधान आहे. कार्यकर्त्याचा अभिमान असतो आणि कार्यकर्त्याला वाटतं की, आपला नेता मुख्यमंत्री व्हावा. त्यामुळे महायुतीत मिठाचा खडा पडण्याचं कोणतंही कारण नाही. महायुती अभेद्य आहे.

महेश लांडगे यांनी केलेल्या वक्तव्याबाबत मला काही म्हणायचं नाही आणि त्याबाबत मला माहितीही नाही. महायुतीत संघर्ष होईल, असं मला वाटत नाही. भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना आणि रिपाइ यांची महायुती आहे, त्यामुळे वेळेनुसार एकत्रितपणे निवडणूक लढवली जाईल, असेही बनसोडे यांनी सांगितले.

महायुती निधी वाटपावरून कोणत्याही तक्रारी नाहीत. ज्या तक्रारी झाल्या असतील, त्या तक्रारींचं निरसन अजितदादांनी केलं आहे. आम्ही आमचा मुद्दा सोडला नाही. महाराष्ट्राच्या विकासासाठी आम्ही भारतीय जनता पक्षासोबत महायुतीत आहोत. शाहू फुले आंबेडकर यांचा विचार घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली आहे. आणि तो विचार घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस वाटचाल करत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT