Pune : मोठी बातमी : पिंपरीचे अण्णा बनसोडे हाकणार विधानसभेचा गाडा; अजितदादांच्या निष्ठावंत आमदाराची उपाध्यक्षपदी निवड

Pune : पिंपरीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांची विधानसभा उपाध्यक्ष पदी निवड झाली आहे. आज (25 मार्च) त्यांचा एकट्याचा अर्ज दाखल होता आणि छाननीत हा अर्ज वैधही ठरला.
Ajit Pawar and Anna Bansode
Sarkarnama Ajit Pawar and Anna Bansode
Published on
Updated on

Pune News : पिंपरीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांची विधानसभा उपाध्यक्ष पदी निवड झाली आहे. आज (25 मार्च) त्यांचा एकट्याचा अर्ज दाखल होता आणि छाननीत हा अर्ज वैधही ठरला. उद्या (26 मार्च) रोजी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे बनसोडे यांची उपाध्यक्ष म्हणून अधिकृत घोषणा करणार आहेत.

विधानसभेचे अध्यक्षपद आणि विधानपरिषदेचे सभपतीपद भाजपकडे आहे. तर विधान परिषदेचे उपसभापतीपद शिवसेनेकडे (Shivsena) आहे. त्यामुळे विधानसभा उपाध्यक्ष पदावर राष्ट्रवादी काँग्रेसने दावा केला होता. यापूर्वी हे पद राष्ट्रवादीच्याच नरहरी झिरवाळ यांच्याकडे होते. यावेळी सामाजिक समतोल साधण्यासाठी अनुसूचित जात प्रवर्गाला उपाध्यक्षपद देणार अशी घोषणा काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी केली होती. त्यानुसार बनसोडे यांना संधी देण्यात येणार आहे.

कोण आहेत आण्णा बनसोडे?

अजित पवार यांचे अत्यंत निष्ठावंत म्हणून अण्णा बनसोडे यांची ओळख आहे. अजितदादांच्या दोन्ही बंडात बनसोडे त्यांच्यासोबत होते. 1997 साली नगरसेवक म्हणून त्यांच्या राजकीय कारकीर्दची सुरुवात झाली. 2002 मध्ये ते पुन्हा निवडून आले. या दरम्यान, त्यांनी स्थायी समितीचे अध्यक्षपदही भुषविले.

2009 मध्ये पिंपरी मतदारसंघ राखील झाला त्यावेळी राष्ट्रवादीकडून अण्णा बनसोडे यांना उमेदवारी देण्यात आली. भाजपच्या अमर साबळे यांचा जवळपास 10 हजार मतांनी पराभव करत बनसोडे पहिल्यांदा आमदार झाले. 2014 मध्ये शिवसेनेच्या गौतम चाबुकस्वार यांनी त्यांना पराभवाचा धक्का दिला. पण 2019 आणि 2024 या दोन्हीवेळी ते पुन्हा आमदार झाले.

संजय बनसोडे आणि राजकुमार बडोले यांची संधी हुकली :

विधानसभा उपाध्यक्षपदासाठी अण्णा बनसोडे यांच्यासह लातूर जिल्ह्यातील उदगीरचे आमदार संजय बनसोडे आणि गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगावचे आमदार राजकुमार बडोले यांची नावे चर्चेत होते. पण अखेर आण्णा बनसोडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला. त्यानुसार त्यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. उद्या त्यांची अधिकृतरित्या निवड जाहीर केली जाणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com