Solapur, 23 October : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अंतिम मतदार यादीत न्यायालयाने ४७ दुग्ध संस्थांचा समावेश करण्याचा आदेश दिला आहे. या आदेशामुळे पंढरपूर तालुक्यातील २७ आणि सांगोला तालुक्यातील २० दुग्ध संस्थांचा समावेश झाल्याने अंतिम मतदार यादी २ हजार ५९६ जणांची झाली आहे. जिल्हा बँकेचे नवे १९ संचालक याच २५९६ मतदारांमधून निवडले जाणार आहेत.
प्रारुप मतदार यादी जाहीर त्यावेळी जिल्हा बॅंकेच्या दुग्ध मतदारसंघात मोहिते पाटील यांच्या माळशिरस तालुक्याचे वर्चस्व होते. या मतदारसंघातील सर्वाधिक मतदान हे मोहिते पाटील यांच्याकडे होते. मात्र, अंतिम मतदारयादीत माजी आमदार बबनराव शिंदे आणि संजयमाम शिंदे यांच्या माढा आणि माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या पंढरपूर तालुक्यात सर्वाधिक मतदार झाले आहेत, त्यामुळे अखेरच्या क्षणी शिंदे बंधू आणि परिचारक यांनी बाजी पलटवत मोहिते पाटील यांच्यापेक्षा अधिकचे मतदार मिळविण्यात बाजी मारली आहे.
प्रारूप मतदार यादी जाहीर झाली, त्यावेळी बँकेच्या दुग्ध संस्था व वैयक्तिक भागधारक मतदारसंघात माळशिरस तालुक्याकडे पर्यायाने मोहिते-पाटील यांच्याकडे सर्वाधिक सभासद होते. मतदार यादी अंतिम झाल्यानंतर या मतदारसंघात माढा व पंढरपूर तालुक्यातील संस्थांची संख्या वाढली आहे.
माजी आमदार बबनराव शिंदे, माजी आमदार संजयमामा शिंदे आणि माजी आमदार प्रशांत परिचारक यांचे या मतदारसंघात वजन वाढले आहे. या मतदारसंघात ३०३ दुग्ध संस्था आणि ३२१ वैयक्तिक भागधारक आहेत. ३०३ दुग्ध संस्थांपैकी ७९ संस्था पंढरपूरकडे, ७६ संस्था माढ्याकडे, ६३ संस्था सांगोल्याकडे व ५९ संस्था माळशिरस तालुक्याकडे आहेत. बाकी तालुक्याकडे फक्त एक अंकीच मतदार आहेत.
कोणत्या मतदारसंघात किती संचालक व मतदार
- विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था (११) : १२४३
- पणन प्रक्रिया (०१) : ११२
- दुग्ध संस्था व वैयक्तिक भागधारक (०१) : ६२४ (दुग्ध संस्था : ३०३, वैयक्तिक भागधारक : ३२१)
- बँका, पतसंस्था व इतर संस्था (०१) : ६१७
- राखीव (महिला दोन, एससी/एसटी एक, ओबीसी एक, भटक्या एक) (०५) : २५९६
- एकूण : २५९६
कोणत्या तालुक्यात किती मतदार
तालुका............. सोसायटी...पणन......दुग्ध....बँका.... एकूण
अक्कलकोट......... ८९..... २४ .......०० ....२३....... १३६
बार्शी............... १३५..... १२ .......१२...... ५५......२१४
करमाळा........... ११३......०५........२४.......२३......१६५
माळशिरस......... १४१...... १९.......६८...... ९४.......३२२
माढा................१७५....... १८.... १९४...... ५०.......४३७
मंगळवेढा.......... ६२ .........०९.... ११....... ४०.......१२२
मोहोळ............ १२०.........०४......२५....... ४४.......१९३
पंढरपूर ...........१८१...........०६..... १२०....४४....... ३५१
सांगोल........... ८०............ १० ......६७.....६४....... २२१
उत्तर सोलापूर.... ६६.............०३.......९२.....१६६.......३२७
दक्षिण सोलापूर... ८१............०२........११......१४........१०८
एकूण.......... १२४३.......... ११२...... ६२४ .....६१७....२५९६
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.