Shahajibapu Patil : शहाजीबापूंचे जरांगेंच्या आरोपांवर गुवाहाटी स्टाईल भाष्य : ‘कुठली तरी क्लिप.. कुठंतरी धाब्यावर, हॉटेलात बोलत बसलेली...’

Manoj Jarange Patil Allegations : मनोज जरांगे पाटील यांनी ऐकीव माहितीवरून गैरसमज करून घेऊ नयेत, असे शहाजीबापू पाटील म्हणाले. एकनाथ शिंदेंचे नेतृत्व पैशांच्या व्यवहारांशी संबंधित नसल्याचा दावा करत त्यांनी जरांगेंना बदनामीबाबत सावध केले.
Manoj Jarange Patil-Shahajibapu Patil
Manoj Jarange Patil-Shahajibapu PatilSarkarnama
Published on: 
Updated on: 

Solapur, 22 October : कुठली तरी क्लिप... कुठंतरी बोलत बसलेली...काय कुठंबी धाब्यावर आणि हॉटेलातही बोलायला लागल्याती... कुणाचं तरी काहीतरी ऐकून मनोज जरांगे पाटील यांनी गैरसमज करून घेऊ नये. पैशाच्या भानगडीतलं एकनाथ शिंदेंचं नेतृत्व नाही. जरांगे पाटलांनी यात स्वतःहून बदनाम व्हायचं कारण नाही. यामध्ये जरांगेंही बदनाम होत चालले आहेत, हे त्यांच्या लक्षात येत नाही, असे विधान शिवसेनेचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी केले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यावर ५०० कोटी रुपये भाजपकडून घेतल्याचे आरोप केले आहेत. त्यावर शिवसेनेकडून माजी आमदार पाटील यांनी स्पष्टीकरण देताना जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधला.

ते म्हणाले, मनोज जरांगे पाटील यांच्या संपूर्ण आंदोलनात मी फक्त एकदा त्यांना भेटायला गेलो होतो. त्यांच्या व्यासपीठावरून पांडुरंगाची आणि माझ्या मुलाची शपथ घेऊन सांगितलं होतं की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी प्रयत्न करत आहेत. ओबीसींवर अन्याय न होऊ देता जास्तीत जास्त मराठ्यांना हे आरक्षण कसं मिळेल, हा फक्त प्रश्न आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी गैरसमजातून ५०० कोटींचे केलेले हे विधान असावं किंवा हे बोलायला लावण्यासाठी जरांगेंच्या पाठीमागे एखाद्यी राजकीय शक्ती उभी राहिली असावी. ही शक्ती कोण आहे, हे मी सांगू शकत नाही. जरांगे यांनी ९० टक्के तर गैरसमजातूनच हे विधान केलं असावं. पण, १० टक्के कोणती तरी राजकीय नेता ज्याचं एकनाथ शिंदे यांच्याविषयी चांगलं मत नसेल. असा एखादा राजकीय नेता त्यांना भेटला असेल. तसेच, त्यांच्या सहकाऱ्यांमधील आरोप-प्रत्यारोपामुळे त्यांनी चिडून हे विधान केलं असावं, अशी शक्यताही त्यांनी बोलून दाखवली.

Manoj Jarange Patil-Shahajibapu Patil
BJP Vs Sanjay Raut : संजय राऊत हे बिश्नोई टोळीचे टीपर आहेत का? : भाजप मंत्र्यांनी तोफ डागली

ते म्हणाले, जरांगे पाटील यांनी व्हायरल केलेल्या क्लिपबाबत चौकशी व्हावी आणि सत्य जनतेसमोर यावे. जरांगेंसारख्या चळवळीतील माणसाने शिंदे यांच्या राजकारणातील गरीबाच्या चळवळीत आयुष्य गेले, अशा माणसावर आरोप करून डाग लावणे महाराष्ट्राला शोभणारे नाही. मराठा समाजाच्या हिताचंही नाही.

Manoj Jarange Patil-Shahajibapu Patil
Shambhuraj Desai On Jarange Patil : शंभूराज देसाईंचा जरांगे पाटलांवर पलटवार : हे तर एकनाथ शिंदेंच्या विरोधातील षडयंत्र

मंगेश चिवटेंच्या माघारीचे कारण....

राजकीय घडामोडींमुळे पुणे शिक्षक मतदारसंघातून मंगेश चिवटे यांची उमेदवारी मागे घ्यावी लागली. पण, शिवसैनिकांची भावना तीव्र बनल्यामुळे सचिन सानप यांना शिवसेनेने पाठिंबा दिला आहे. सानप हे शंभर टक्के विजयी होणार आहेत. पाच जिल्ह्यांतून सानपांची उमेदवारी मतदारांनी उचलून धरली आहे. पदवीधरमध्ये डॉ स्मिता जाधव यांच्यासाठी शिवसेना काम करत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com