Nilam Gorhe sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

कोविड बाधित एकल शेतकरी महिलांना मिळणार मोफत बियाणे, खते...नीलम गोऱ्हे

कोविडमुळे covid 19 मृत्यू Death झालेल्यांच्या मालमत्ता हस्तांतरणाचा Transfer of property प्रश्नही निकाली काढण्यासाठी पालिका palika व महानगरपालिकांना Maha palika सूचना केल्या असल्याचे उपसभापती गोऱ्हे Nilam Gorhe यांनी सांगितले.

सरकारनामा ब्युरो

सातारा : कोविडमुळे पतीचे निधन झालेल्या शेतकरी महिलांना तसेच कोविड एकल शेतकरी महिलांना शासनाकडून तीन एकरापर्यंत मोफत बियाणे व खते मिळणार आहेत. त्यासाठी कृषी विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय आणि माणदेशी महिला बॅंकेने पुढाकार घेतला आहे, अशी माहिती विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.

सातारा जिल्ह्यात शासनाने केलेल्या कोविड उपाय योजना जनतेपर्यंत किती पोहोचल्या याचा आढावा घेण्यासाठी उपसभापती नीलम गोऱ्हे साताऱ्यात आल्या होत्या. जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन आढावा घेतल्यानंतर त्यांनी शासकिय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला.

त्या म्हणाल्या, कोविडमुळे जिल्ह्यातील २२०२ जणांचा मृत्यू झाला असून त्या सर्वांना ५० हजारांची मदत मिळालेली आहे. यातील ९८९ एक पालक असलेले असून पतीचे निधन झालेल्या ८५० महिला आहेत. यातील शेतकरी महिलांना तीन एकरपर्यंत बियाणे व खते मोफत द्यावीत अशी सूचना केली होती. त्याची अंमलबजावणी आता कृषी विभाग, जिल्हाधिकारी, माणदेशी महिला बॅंक करणार आहेत.

खासगी हॉस्पिटलमध्ये जादा बिलांची आकारणी केली होती, त्याचा अहवाल उद्या मिळणार आहे. गरीब लोकांना धर्मादाय रुग्णालयात काही बेड राखीव ठेवण्यात येतात त्यातील शिल्लक बेड समजावेत यासाठी रुग्णालयांनी डॅश बोर्ड करण्याची सूचना जिल्हा प्रशासनाला केली आहे. श्रमिक कामगारांच्या पोर्टलवर १७ ते ३० मे यकालावधीत नोंदणी सुरु होणार आहे.

महामंडळांनी कोविड एकल महिलांना मदत करावी, अशीही सूचना केल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पूर परिस्थितीत कोल्हापूरच्या धर्तीवर साताऱ्यत ही ॲप तयार करावे, त्यासाठी शंभर गावांचा त्यामध्ये समावेश करण्याचा निर्णय झाला आहे. कोविडमुळे मृत्य झालेल्यांच्या मालमत्ता हस्तांतरणाचा प्रश्नही निकाली काढण्यासाठी पालिका व महानगरपालिकांना सूचना केल्या असल्याचे त्यांनी सांगून सातारा जिल्ह्याला कोविडतंर्गत ७० कोटींची मदत दिल्याचे त्यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT