पुरावे द्या, अन्यथा आरोप मागे घ्या : निलम गोऱ्हेंचे चित्रा वाघ यांना आव्हान

पीडित युवतीसह तिच्या कुटुंबियांचे सुरक्षित पुनर्वसन करण्याची सूचनाही उपसभापती गोऱ्हे यांनी जिल्हा प्रशासनास केली.
Nilam Gorhe, Chitra Wagh
Nilam Gorhe, Chitra Wagh sarkarnama
Published on
Updated on

सातारा : महाबळेश्वरच्या घटनेतील युवतीवरील अत्याचारप्रकरणी आरोप करणाऱ्या भाजप महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करून पुरावे द्यावेत आणि मग कोणाला सहआरोपी करायचे याची भाषा करावी. गुन्हा मुलांनी केल्यावर शिक्षा वडिलांना देण्याचे कोणत्या कायद्यात बसते, हे सांगून आमच्यावर आरोप करण्यापूर्वी ते सिध्द करावे नाही तर ते आरोप तत्काळ मागे घ्यावेत, असे प्रत्युत्तर विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिले.

पीडित युवतीसह तिच्या कुटुंबियांचे सुरक्षित पुनर्वसन करण्याची सूचनाही उपसभापती गोऱ्हे यांनी जिल्हा प्रशासनास केली. भाजप महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी महाबळेश्वरचे माजी नगराध्यक्ष दत्तात्रय बावळेकर यांना महाबळेश्वर युवती अत्याचार प्रकरणात सहआरोपी करावे, तसेच पोलिस यंत्रणा महाविकासआघाडीच्या दावणीला बांधल्याचा आरोप केला होता. याचा आज उपसभापती निलम गोऱ्हे यांनी साताऱ्यातील शासकिय विश्रामगृहात घेतलेल्या पत्रकार परिषेदत समाचार घेतला. यावेळी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, पोलिस अधीक्षक अजयकुमार बंन्सल उपस्थित होते.

Nilam Gorhe, Chitra Wagh
अजित पवार यांनी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांची भरसभेत मागितली माफी; पाहा व्हिडिओ

निलम गोऱ्हे म्हणाल्या, महाबळेश्वर येथील पीडित युवतीच्या कुटुंबास मी भेटले. याबाबत जी घटना घडली त्याचा तपशील समजून घेतला आहे. ज्या सोसायटीत त्या राहातात तिथे त्या मुलीला कोणताही त्रास नसल्याचे सांगितले. त्याशिवाय मुलीच्या व कुटुंबियांच्या सुरक्षेसह त्यांचे मनोधैर्य अथवा इतर शासकीय योजनेच्या माध्यमातून पुनर्वसन करण्याची सूचना मी केली आहे. महाबळेश्वर प्रकरणातील आरोपीस पोलिसांनी जेरबंद केले आहे. पण गुन्हा दाखल होण्यापूर्वी पीडित मुलीस दिवस गेले होते तीची डिलीव्हरी झाली पण माणुसकी म्हणून तिची साधी चौकशी देखील संबंधितांनी केली नव्हती. हीच गोष्ट अमानवी असून डीएनए अहवालानंतर पुढील कार्यवाही होईल.

चित्रा वाघ यांनी केलेल्या आरोपांवर गोऱ्हे म्हणाल्या, त्यांचेकडे पुरावे असतील तर त्यांनी न्यायालयात सादर करावेत.उगाच हवेत बाण मारू नयेत. त्यांच्याकडे किरीट सोमय्या सारखे कायदेतज्ञ आहेत. कोणत्याही प्रकरणात विरोधी पक्ष बोलू शकतो. पण, त्यांनी पुराव्यासह बोलावे. वाईच्या महिला उपविभागीय अधिकारी चांगल्याप्रकारे तपास करत आहेत. त्यामुळे कोण कोणाच्या दावणीला बांधलेले नाही. दावणीतून सुटलेलेच यांना भेटले असतील. त्यामुळे आता दावणचं मजबूत करू, असा टोला त्यांनी लगावला.

Nilam Gorhe, Chitra Wagh
उदय सामंत म्हणतात, फडणवीसांना मी भेटलो हे मान्य पण...

या प्रकरणात जे कोणी दोषी आहेत, त्यांना शिक्षा होईलच पण मुलांची शिक्षा वडिलांना द्यायची हा कोणता न्याय ? वस्तुनिष्ठ चौकशी होईल व डीएनए चाचणीनंतरच चार्जशीट दाखल होईल. त्यामुळे आरोप करणाऱ्यांनी आरोप प्रतिज्ञापत्र देऊन न्यायालयात सिध्द करावे. अन्यथा, आरोप मागे घ्यावेत, असे गोरे यांनी सुनावले. महिला अत्याचारात महाराष्ट्र देशात पाचव्या क्रमांकावर असून राज्यातील महिला अत्याचाराच्या घटनात मागील तुलनेत २०२० मध्ये 0.5 ने कमी झाल्या आहेत. कदाचित कोरोनामुळे आरोपींना बाहेर पडता आले नसावे, म्हणून असावे.

राजकारणात न्यायाची भूमिका ही पारदर्शकच राहिली आहे. ज्याने जो गुन्हा केला आहे, त्याप्रमाणे आरोपपत्र दाखल होईल. या कुटुंबास संरक्षण मिळण्यासाठी मी शिफारस केली असून त्यानुसार त्या कुटुंबाची काळजी घेतली जाईल. या कुटुंबास घर देण्यासोबतच त्या मुलीला पुन्हा शिकण्यासाठीही मदत केली जाणार आहे. संजय राऊत म्हणतात की पुढील मुख्यमंत्री शिवसेनेचा असेल, याविषयी विचारले असता निलम गोऱ्हे यांनी अधिक बोलणे टाळत हा त्यांचा अंदाज असेल आणि तो योग्यही असेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com