Crime
Crime  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

महाराष्ट्र केसरी गुलाब बर्डे व त्यांच्या कन्येवर गुन्हा दाखल

विलास कुलकर्णी

राहुरी ( जि. अहमदनगर ) - राहुरी शहरात गावठी पिस्तुलांचे पेवफुटले आहे. अशातच राहुरीत दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्र केसरी पैलवान गुलाब बर्डे यांची कन्या तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या ( NCP ) नगरसेविका सोनाली बर्डे-माळी यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. या प्रकरणात आरोपींना पोलिसांनी अटक केले होते. या प्रकरणाला आता वेगळेच वळण लागले असून सोनाली बर्डेंवर हल्ला करणाऱ्या पवार गटाकडून पैलवान गुलाब बर्डे, सोनाली बर्डे-माळी यांच्यासह दहा जणांविरोधात राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी दमदाटी, मारहाण व जीवे मारण्याची धमकी देण्याचा गुन्हा दाखल करून घेतला आहे. ( Crime filed against Maharashtra Kesari Gulab Barde and his daughter )

गुलाब मोहन बर्डे, करण भारत माळी, पप्पू गुलाब बर्डे, बजरंग गुलाब बर्डे, गोरख मोहन बर्डे, आशा गुलाब बर्डे, सोनाली करण माळी, पवन रमेश साळवे, बाजे जनार्दन बर्डे, नारायण भारत माळी अशी आरोपींची नावे आहेत.

राहुरी शहरात शुक्रवारी (ता. 18) दुपारी राहुरी ग्रामीण रुग्णालयात समोरील एकलव्य वसाहतीत दोन गटात जोरदार धुमश्चक्री झाली. अंकुश पवार याने गावठी पिस्तुलातून गोळीबार केला. त्यात, सोनाली बर्डे-माळी यांचा हाताच्या कोपरा खाली गोळी घुसली. त्यानंतर दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. गोळीबार केलेल्या पवार गटाच्या सहा जणांविरुद्ध आर्म ॲक्टसह जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला. तीन जणांना अटक करण्यात आली. तीन जण अद्यापपावेतो पसार आहेत.

पवार गटातर्फे शोभा अमर पवार (रा. एकलव्य वसाहत, राहुरी) यांनी आज फिर्याद दिली. तीत म्हंटले की, शुक्रवारी (ता. 18 ) दुपारी बारा वाजता शोभा पवार व काही नातेवाईक घरासमोर उभे होते. यावेळी जुन्या भांडणाच्या कारणावरून आरोपी लोखंडी कत्ती, लाकडी दांडे घेऊन धावून आले. शोभा पवार, अमर पवार, अंकुश पवार यांना मारहाण केली. शिवीगाळ, दमदाटी करून तलवारीने जिवे मारण्याची धमकी दिली." पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार साईनाथ टेमकर करीत आहेत. गुलाब बर्डे यांनी 1986 साली सोलापूर येथे झालेली महाराष्ट्र केसरी स्पर्धा जिंकली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT