Supriya Sule, Ramesh Shinde, Baban Shinde Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sharad Pawar Vs Ajit Pawar : माढ्यात ट्विस्ट! शिंदे बंधू झुंजणार? शरद पवार गटाचा मोठा डाव

Baban Shinde And Ramesh Shinde : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटीनंतर आमदार बबन शिंदे यांनी अजित पवारांची साथ दिली. त्यामुळे माढ्यात शरद पवार गटाला सक्षम उमेदवाराच्या शोधात आहे.

Sunil Balasaheb Dhumal

Madha Vidhan Sabha Politics : लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभेत आपली जागा शाबूत करण्यासाठी अनेक नेत्यांनी आपले पत्ते उघडण्यास सुरूवात केली आहे. यातूनच माढा विधानसभेत अजित पवार गटातील शिंदे बंधूंमध्ये फूट पडण्याची चर्चा सुरू झाली आहे.

आमदार बबन शिंदे यांचे सख्खे धाकटे भाऊ रमेश शिंदे यांनी विमानात शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेतली आहे. या भेटीमुळे विधानसभा निवडणुकीत शिंदे कुटुंबात मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार असल्याचे बोलेले जात आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटीनंतर आमदार बबन शिंदे Baban Shinde यांनी अजित पवारांची साथ दिलेली. त्यामुळे माढ्यात शरद पवार गटाला सक्षम उमेदवाराच्या शोधात आहे. माढ्यात बदललेली राजकीय स्थिती ओळखून आमदार बबन शिंदे यांच्या सख्खे भाऊ रमेश शिंदे यांनी पहिले पाऊल उचलल्याचे दिसून आले. त्यांनी थेट दिल्लीत सुप्रिया सुळेंची भेट घेतली आहे. आता या बदलेल्या राजकीय चित्रात माढ्यात शिंदे बंधु यांच्यातच राजकीय संघर्ष होण्याची कुजबूज आहे.

बबन शिंदे हे माढा तर त्यांचे भाऊ संजय शिंदे हे करमाळ्याचे आमदार आहेत. त्यातच त्यांचे धाकटे बंधु रमेश शिंदे यांनी सुप्रिया सुळेंची Supriya Sule भेट घतल्याने माढ्यात शिंदे बंधु आपसात झुंजण्याची शक्यता असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

आमदार बबन शिंदे यांनी त्यांचे चिरंजीव रणजितसिंह शिंदे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची तयारी केली आहे. तर रमेश शिंदे यांनीही आपला मुलगा धनराज यांना मैदानात उतरवण्यासाठी फिल्डिंग लावल्याचे चित्र आहे. परिणामी आगामी निवडणुकीत बबन शिंदे आणि रमेश शिंदे यांच्यात ठिणगी पडण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाने माढ्यातून भाजपला धक्का दिला. मोहिते कुटुंबाला प्रवेश देऊन धैर्यशील मोहिते पाटील यांना खासदार केले. आता माढा विधानसभेत शरद पवार गटाने अजित पवार गटावर मोठा डाव टाकला आहे.

अजित पवार गटाचे ज्येष्ठ आमदार बबन शिंदे यांच्या सख्खे बंधु रमेश शिंदेंना आपल्या पक्षात घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे माढ्यातून रणजितसिंह शिंदे आणि धनराज शिंदे या चुलत बंधु यांच्यात लढत झाली तरी हा संघर्ष बबनदादा आणि रमेश शिंदे यांच्यातील असेल, असे बोलले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT