Lahu Kanade
Lahu Kanade Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

लहू कानडेंची ससाणे गटावर अप्रत्यक्ष टीका : गद्दार म्हणणारे ढोंगी

सरकारनामा ब्युरो

महेश माळवे

श्रीरामपूर ( जि. अहमदनगर ) - श्रीरामपूर नगरपालिकेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. 20 जुलैपासून आचारसंहिता लागू होणार आहे. मात्र श्रीरामपूर तालुक्यातील काँग्रेसमधील दुही थांबण्याचे नाव घेत नसल्याची स्थिती आहे. श्रीरामपूरमध्ये ससाणे व कानडे असे दोन गट सक्रिय झाले आहेत. करण ससाणे ( Karan Sasane ) यांच्या गटातील काही लोकांनी आमदार लहू कानडे यांच्या विषयी पक्षातील वरिष्ठांकडे तक्रार केली होती. या तक्रारीला लहू कानडे यांनी एका कार्यक्रमातील भाषणातून प्रतिउत्तर दिले. Shrirampur Congress News Update

शहरातील ईदगाह मैदान येथे संरक्षक भिंत, कम्युनिटी हॉल, स्वच्छतागृह आदी सुविधा उपलब्ध करणे या 35 लक्ष रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ आमदार कानडे यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी नगरसेवक मुजफर शेख, अंजुम शेख, ॲड. समीन बागवान, शहरकाझी मौलाना अकबर अली, संविधान बचावचे अहमद जहागीरदार, मुक्तार शाह, माजी नगरसेवक अशोक कानडे, डॉ. वंदना मुरकुटे, मौलाना इमदाद अली, मौलाना इर्शाद, याकूब बागवान, कलीम कुरेशी, महंमद शेख, सलीम शेख, मुन्ना पठाण आदी उपस्थित होते.

आमदार लहू कानडे म्हणाले की, काही मंदबुध्दीच्या लोकांना पोटसूळ उठला असून आमदारांना आवरा अशी भाषा ते करु लागले आहेत. जनता जनार्दनाची कामेच करु नयेत अशी भावना असणारांची किव वाटते. असल्या किरकोळ लोकांकडे दुर्लक्ष करुन या मतदारसंघातील विकासाची घोडदौड सरकार बदलले असले तरी देखील अशीच चालू राहिल, अशी नामोल्लेख टाळत कानडे यांनी टीका केली.

ते पुढे म्हणाले, की रोजीरोटी व्यतिरिक्त सर्वसामान्य माणसाला स्वाभिमानाने जगता आले पाहिजे. प्रत्येकाला आपापल्या धर्माप्रमाणे आचरण करण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे. लाचारी सोडून स्वाभिमानाने जगू इच्छिणाऱ्यांना गद्दार म्हणणारे ढोंगी असतात. त्याकडे दुर्लक्ष करुन आपण संविधान वाचविण्याची लढाई स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना लढलीच पाहिजे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये काँग्रेसचा झेंडा फडकेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

या मतदारसंघातील जनतेने प्रेमाने स्विकारल्यानेच आपण आमदार झालो. या उपकाराची परतफेड करण्यासाठी पहिल्या दिवसापासून गोरगरिब जनतेचे प्रश्न समजून घेऊन कामाला लागलो. आज अडीच वर्षानंतर मागे वळून पाहतांना आपण मोठ्या प्रमाणावर निधी आणला आणि पारदर्शकपणे खर्च केला. त्यामुळे संपूर्ण मतदारसंघात असंख्य कामे उभी राहिली, असे त्यांनी सांगितले.

यावेळी अल्लाउद्दीन शेख, बाबा इनामदार, तय्यब शेख, जावेद बागवान, जलील काझी, सोहेल शेख, साजिद मिर्जा, शहनवाज दारुवाला, अहमद शाह, अमीन शाह, मुद्स्सर शेख, इलियाज पठाण, शरीफ शेख, शकिर सरकार, भैय्या शाह, फिरोज शेख आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT