श्रीरामपूरसाठी भानुदास मुरकुटे, करण ससाणे आले एकत्र

श्रीरामपूर ( Shrirampur ) तालुक्यातील अशोकनगर येथील अशोक सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे.
Bhanudas Murkute, Shrirampur

Bhanudas Murkute, Shrirampur

Sarkarnama

श्रीरामपूर (अहमदनगर) : श्रीरामपूर ( Shrirampur ) तालुक्यातील अशोकनगर येथील अशोक सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे राजकीय वातावरण तापू लागले आहे. तालुक्याच्या विकासासाठी आगामी सर्वच निवडणुका जे येतील, त्यांना सोबत घेऊन एकजुटीने लढविणार असल्याची घोषणा माजी आमदार भानुदास मुरकुटे व उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी केली आहे. Bhanudas Murkute and Karan Sasane came together for Shrirampur

जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुरकुटे आणि ससाणे यांची युती झाली. त्यानंतर आता अशोक कारखाना निवडणूक जाहीर झाल्यानंतर ससाणे गटाच्या भुमिकेकडे तालुक्याचे लक्ष लागले होते. अखेर आज (गुरुवारी) सायंकाळी नगरसेवक संजय फंड यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत माजी आमदार मुरकुटे व उपनगराध्यक्ष ससाणे यांनी युतीची घोषणा केली. या पत्रकार परिषदेला साई संस्थानचे विश्वस्त सचिन गुजर, नगरसेवक श्रीनिवास बिहाणी, संजय छल्लारे, मुजफ्फर शेख, सुधीर नवले, राजेंद्र पाउलबुद्धे, नीरज मुरकुटे, संकेत संचेती, दिलीप नागरे, बाबासाहेब दिघे यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

<div class="paragraphs"><p>Bhanudas Murkute, Shrirampur</p></div>
नगर जिल्हा काँग्रेसचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष करण ससाणे यांचा राजीनामा : काँग्रेसला झटका

माजी आमदार भानुदास मुरकुटे म्हणाले, तालुक्याच्या विकासासाठी लोकविकास आघाडी व काँग्रेस पक्ष यापुढे नगरपालिका, जिल्हा परिषद, बाजार समिती, मुळाप्रवरासह सर्वच निवडणुका एकत्रित लढविणार आहे. जिल्हा बँक निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली आपण मतदारसंघात जिल्हा बँकेत आपण व ससाणे बिनविरोध निवडून आलो.

मुरकुटे पुढे म्हणाले की, पुढील काळात पाण्यासाठी संघर्ष होणार असून निळवंडेमुळे आपल्याला फटका बसणार आहे. पाणीवाटप कायद्यामुळे पाऊस कमी झाल्यास भांडरदातुन दोन टीएमसी पाणी जयकवाडीसाठी सोडले जाणार आहे. परिणामी, तालुक्यातील ऊस व शेती व्यवसाय अडचणीत येणार आहे. सहकार क्षेत्रात राजकारण बाजूला ठेवून कारखाना निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. इतर तालुक्यामध्ये राजकीय परिस्थिती राजकीय संघर्षाची असताना देखील संगमनेर, प्रवरा, ज्ञानेश्वर, मुळा, वृद्धेश्वर कारखान्याच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. त्याप्रमाणे अशोकची निवडणूकही बिनविरोध करण्याचा आपला प्रयत्न असून सर्वांना सोबत घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

<div class="paragraphs"><p>Bhanudas Murkute, Shrirampur</p></div>
माजी आमदार भानुदास मुरकुटे लागले लोकसभेच्या तयारीला

करण ससाणे म्हणाले, अशोक कारखाना तालुक्याची कामधेनू असून सत्तांतर झालेले कारखान्यांना अनेक अडचणी आल्या. मात्र माजी आमदार मुरकुटे यांनी चांगले कार्य केले. असून सहकार संस्थेत विनाकारण राजकारण करणार नाही. माजी आमदार भानुदास मुरकुटे, महसुलमंत्री बाळासाहेब थोरात, आमदार लहु कानडे यांच्याशी चर्चा करुन नगरपालिकेसह इतर निवडणुका दोन्ही गटाना एकत्रीत आणून युती करुन लढविणार असल्याचे उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com