Dahiwadi Nagarpanchayat Building inaguration sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Maan Political News : दहिवडी नगरपंचायत इमारतीचा श्रेयवाद पेटला; शरद पवारांआधी भाजपने केले तृतीयपंथींच्या हस्ते उद्‌घाटन

Umesh Bambare-Patil

Maan Political News : दहिवडी नगरपंचायतीच्या नूतन मुख्य प्रशासकीय इमारतीचे उदघाटन उद्या (ता. २५) खासदार शरद पवार यांच्या हस्ते करण्याचे नियाोजन राष्ट्रवादी कॉग्रेसने केले होते. मात्र दहिवडी नगरपंचायतीच्या नूतन इमारतीसाठी आमदार जयकुमार गोरे यांनी निधी मंजूर केल्याचे सांगत भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तृतीयपंथी रवी जाधव यांच्या हस्ते या नुतन इमारतीचे उद्घा‌टन केले.

दहिवडी (ता.माण) येथे विविध कार्यक्रमासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार Sharad Pawar उद्या शुक्रवारी येत आहेत. या दरम्यान ते दहिवडी नगरपंचायतीच्या नूतन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन करणार होते. याला भाजपच्या माजी नगराध्यक्ष सौ. साधना गुंडगे यांच्यासह भाजपचे BJP पदाधिकारी,आजीमाजी नगरसेवक, कार्यकर्ते यांनी विरोध केला आहे.

आमच्या कामाचे श्रेय तुम्ही घेऊ नये, म्हणत श्री. पवार यांनी उद्घा‌टन करण्याअगोदरच भाजपने उद्घा‌टन करत मोठी खेळी केली. शरद पवार यांच्या अगोदर तृतीयपंथीयाच्या हस्ते इमारतीचे उदघाटन झाल्याची चर्चा तालुकाभर चांगलीच रंगली. या इमारतीचे उद्घा‍टन शरद पवार पुन्हा करणार का ?याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

या उदघाटनास भाजपचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव शिंदे, भाजप महिला तालुकाध्यक्ष व माजी नगराध्यक्षा सौ.साधना गुंडगे, नगरपंचायतीचे विरोधी पक्षनेते धनाजी जाधव, नगरसेवक रुपेश मोरे, नगरसेविका नीलिमा जाधव ,राणी अवघडे, उज्वला पवार, स्वीकृत नगरसेवक सयाजी मोरे, संजय गांधी,सिद्धार्थ गुंडगे, अतुल जाधव, नीलम शिंदे, रमेश जाधव, लक्ष्मण जाधव, गोपीचंद अवघडे, महेश कदम, सचिन पुकळे, विशाल घोरपडे, दिलीपभाऊ जगदाळे, विजय जाधव, रवी सकुंडे, शैलेश खरात, अमर पवार, प्रकाश जाधव, डॉ.अजित दडस, काकासाहेब शिंदे, किसन जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

Edited By Umesh Bambare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT