Udayanraje Bhosale News : ऐतिहासिक सातारा नगरीत छत्रपती संभाजी महाराज यांचे भव्य स्मारक होणार आहे. या प्रकल्पासाठी दोन कोटी रुपये मंजूर झाले असून यासाठी स्वराज्य रक्षक संभाजी महाराज स्मारक प्रतिष्ठानची रितसर नोंदणी करण्यात आली आहे, अशी माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली आहे.
यासंदर्भात खासदार उदयनराजे Udayanraje Bhosale यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले की, स्वराज्याचे दुसरे छत्रपती आणि स्फूर्तीदायी व्यक्तीमत्व म्हणून छत्रपती संभाजी महाराज Chhatrapati Sambhaji Maharaj यांना संपूर्ण देश ओळखतो. साता-यात त्यांनी त्याकाळी केलेल्या अवर्णनीय बाबी खुप आहेत. असे असूनही छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक साता-यात नाही.
याची उणीव भासत होती. ऐतिहासिक व्यक्तीचे स्मारक होण्यासाठी अनेक कसरती कराव्या लागत आहेत. तरीसुध्दा काहीही झाले तरी छत्रपती संभाजी महाराज यांचे भव्य स्मारक साताऱ्यात उभे करण्याचा संकल्प सोडला होता. त्यादृष्टीने राज्य शासनाकडे पाठपुरावा केला आहे.
छत्रपती संभाजी महाराज यांचा त्यांच्या लौकिकास शोभुन दिसेल असा पुतळा आणि स्मारक उभारणी तसेच त्यानंतर त्याची निगा राखण्यासाठी या प्रतिष्ठानच्या माध्यमातुन सूचना प्रस्तावित केल्या जाणार आहेत. स्मारकाचे संपूर्ण काम सातारा नगरपरिषदेच्या माध्यमातुन होणार आहे. त्यासाठी नुकताच दोन कोटींचा निधी प्राप्त झाला आहे.
या उपक्रमासाठी स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज स्मारक प्रतिष्ठान या नावाने संस्था स्थापन केली आहे. या संस्थेचे उपाध्यक्ष पत्रकार हरिष पाटणे तर विलास शिंदे यांची सचिव म्हणून नियुक्ती केली आहे. सर्वांचा आग्रहामुळे संस्थेचे अध्यक्षपद आम्ही स्वत: स्विकारले आहे.
या संस्थेत दत्तात्रय बनकर, पत्रकार शरद काटकर, विनोद कुलकर्णी, मनोज शेंडे, वसंत लेवे, संजय पाटील, किशोरतात्या शिंदे, संग्राम बर्गे, अमित कुलकर्णी, अभिजीत बारटक्के, ईशाद बागवान, सुजित जाधव, सचिन साळुंखे, अमोल तांगडे यांचा समावेश आहे.
Edited By : Umesh Bambare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.