CM Eknath Shinde News : विरोधकांना काही कामच नाही, रोज आरोप करत आहेत. आम्ही कामातून त्यांना उत्तर देत असून, त्यांनी बंद पाडलेले प्रकल्प आम्ही पुन्हा सुरू करतोय. इगो ठेवून त्यांनी कामे बंद केली. अहंकारी वृत्तीने राज्य चालत नाही, त्यामुळे आम्ही त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही, असे प्रत्युत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना दिले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde आज आपल्या दरे गावी मुक्कामी आले आहेत. या वेळी त्यांनी बांबू लागवड करून कोयना जलपर्यटन प्रकल्पाच्या कामाचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. या वेळी एल्विश यादव elvish Yadav प्रकरणावरून मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान वर्षा बंगला हे ड्रग्जमाफियाचा अड्डा झालाय, अशी टीका संजय राऊतांनी केली होती. यालाही मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, विरोधकांना काही कामच नाही, रोज आरोप करताहेत. आम्ही कामातून उत्तर देतोय. त्यांनी बंद पाडलेले प्रकल्प आम्ही सुरू करतोय. इगो ठेवून तुम्ही कामं बंद केली, असे राज्यकर्ते नसतात. अहंकारी वृत्तीने राज्य चालत नाही. त्यामुळे आम्ही त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही. त्यांना सकाळी उटल्यावर काही काम नसतं, त्यामुळे ते बोलतात. आम्ही राज्यातील विकासाचे प्रकल्प पुढे नेतोय. यामुळे जे कोणी बोलताहेत, त्यांना काही बोलायचं नाही.
काल आमची तिन्ही पक्षांच्या समन्वयाबाबत बैठक झाली. मराठा आरक्षणाबाबत बोलणं झालं. शिवसेना- भाजप, अजित पवार राष्ट्रवादी हे एक दिलानं काम करतील आणि येणाऱ्या लोकसभेत लोकं आम्ही केलेलं काम पाहून राज्यात आमच्या 45 जागांवर आल्याशिवाय राहणार नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले. Maharashtra Political News
टिकणारं आरक्षण देऊ
मनोज जरांगे पाटील यांना मी धन्यवाद दिले आहेत. सरकार मराठा समाजाच्यासाठी टिकणारं आणि कायद्याच्या चौकटीत बसणार आरक्षण देणार आहोत. शासनाच्या शब्दावर विश्वास ठेवला आहे. आम्ही दिवसरात्र एक करून कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देऊ.
Edited By : Umesh Bambare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.