Thane News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत फोटो अथवा सेल्फी काढण्याचा मोह कोणालाच आवरता येत नाही. अशातच शुक्रवारी ठाण्यातील निवासस्थानाहून मुंबईच्या दिशेने निघाले असताना, निवासस्थानाबाहेर कार्यकर्त्यांनी शिंदे यांच्या सोबत फोटो काढण्याची विनंती केली. त्यावेळी त्यांनी विनंती मान्य करत फोटो काढले. मात्र, या वेळी फोटो काढत असताना सुरक्षारक्षकाने त्यांना हटकले. मात्र, याचवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुरक्षारक्षकावर चांगलेच भडकल्याचे दिसून आले.
राज्याच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे हे विराजमान झाल्यानंतर आपल्या हक्काचा माणूस मुख्यमंत्री झाल्याची भावना सर्वसामान्य कार्यकर्त्यांची झाली आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री झाल्यानंतरदेखील त्यांच्या अवतीभवती कार्यकर्त्यांचा गराडा कायम दिसतो. मुख्यमंत्री शिंदे हे आपल्या हक्काचे मुख्यमंत्री असल्याने त्यांच्या सोबत फोटो काढण्याची इच्छा कार्यकर्त्यांना असते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत फोटो काढण्याची इच्छा मनाशी बाळगून ठाण्यातील खासगी निवासस्थानाबाहेर आलेल्या कार्यकर्त्यांना मुख्यमंत्री शिंदे यांनी आपला ताफा थांबवला. या वेळी फोटो काढण्याची कार्यकर्त्यांनी विनंती केली. त्या विनंतीला मान देत, या कार्यकर्त्यांसोबत शिंदे यांनी फोटोही काढले. मात्र, या वेळी फोटो काढताना कार्यकर्त्यांना सुरक्षारक्षकाने हटकले. कार्यकर्त्यांना हटकणाऱ्या सुरक्षारक्षकावर मुख्यमंत्री शिंदे चांगलेच भडकले.
यानंतर मुख्यमंत्री शिंदेंनी कार्यकर्त्यांची विचारपूस केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांचा ताफा मुंबईच्या दिशेने रवाना झाला. आपल्या कार्यकर्त्यांचा हट्ट मुख्यमंत्र्यांनी पूर्ण केल्यामुळे कार्यकर्तेही चांगलेच खूश झाले, पण मुख्यमंत्री शिंदे सुरक्षारक्षकावर भडकल्याचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
Edited by Ganesh Thombare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.