Dhairyasheel Mane Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Dhairyasheel Mane : राहुल आवाडेंसाठी विधानसभेचा प्रचार करताना धैर्यशील मानेंना लोकसभेची चिंता?

Dhairyasheel Mane in Shahapur Rally News : जाणून घ्या, शहापुरच्या सभेत नेमकं काय म्हणाले? इचलकरंजीतील भाजपचे उमेदवार राहुल आवाडे यांच्या प्रचारार्थ खासदार धैर्यशील माने यांनी देखील उडी घेतली आहे.

Rahul Gadkar

Ichalkaranji Assembly Constituency: सध्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार पक्ष यांच्यात लढत होत आहे.

लोकसभा निवडणुकीत आमदार प्रकाश आवाडे यांनी महायुतीचे उमेदवार खासदार धैर्यशील माने यांना पाठिंबा देत मताधिक्य दिले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत त्याची परतफेड करण्यासाठी इचलकरंजीतील भाजपचे उमेदवार राहुल आवाडे यांच्या प्रचारार्थ खासदार धैर्यशील माने यांनी देखील उडी घेतली आहे.

शहापूर येथे झालेल्या सभेत खासदार धैर्यशील माने (Dhairyasheel mane) यांना मात्र विधानसभा निवडणुकीत आतापासून लोकसभेची चिंता लागून राहिली आहे. तीन ते चार महिन्यापूर्वीच हातकणंगले विधानसभा मतदारसंघातून माने निवडून आले आहेत.

इचलकरंजीचे उमेदवार राहुल आवाडे (Rahul Awade) हा माझा कॉलेजचा मित्र आहे. मी खासदार झालो. पण मेरा नंबर कब आएगा? असे राहुलला वाटत होतं. पण आमदार प्रकाश आवाडे यांनी राहुलची उमेदवारी घोषित केली. असे सांगत "(प्रकाश आवाडे) अण्णांचा विषय लई हार्ड हाय, पण राहुलकडे आण्णाचं क्रेडिटचं कार्ड हाय. हे कार्ड विकासाच आहे ते बाहेर काढलंच पाहिजे. पण इथं जातीच कार्ड चालणार नाही. असे ठणकावून खासदार माने यांनी सांगितले.

इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून राहुल आवाडे गोलीगत निवडून येतील. येणाऱ्या 20 तारखेला महायुतीला प्रचंड मताधिक्य मिळेल असा विश्वास खासदार माने यांनी व्यक्त करत, 23 तारखेला विरोधकांना झापूक झुपुक करण्याची वेळ येईल, असा टोला लगावला.

पुढे बोलताना माने यांनी, आमदार आवाडे यांना उद्देशून घराणेशाहीचा मुद्दा खोडून काढायला पाहिजे. पण आण्णा आता तुम्ही एकटे आहे म्हणून लोकसभेचा विचार करू नका. आताच सगळ्याच्या समोर सोडवून घेतो. आवाडे कधीच दुसऱ्याचा ताटात हात घालत नाहीत. बाळासाहेब माने यांचा नातू आहे, एकदा शब्द दिला की मागे हटत नाही. येत्या काळात महायुतीचे उमेदवार राहुल आवाडे यांना निवडून आणणार, असा शब्दही त्यांनी दिला.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT