Dashrath Sawant & Ajit Pawar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

अजित पवारांना स्टेजवर जाऊन जाब विचारणार

दशरथ सावंत यांच्या परिवर्तन पॅनलने निवडणुकीतून माघार घेत माजी मंत्री मधुकरराव पिचड ( Madhukarrao Pichad ) यांच्या पॅनलला पाठिंबा दिला आहे.

शांताराम काळे

अकोले ( जि. अहमदनगर ) - अगस्ती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सध्या सुरू आहे. यात शेतकरी नेते दशरथ सावंत यांच्या परिवर्तन पॅनलने निवडणुकीतून माघार घेत माजी मंत्री मधुकरराव पिचड ( Madhukarrao Pichad ) यांच्या पॅनलला पाठिंबा दिला आहे. दशरथ सावंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सीताराम गायकर यांना विरोध म्हणून हा पाठिंबा दिला असल्याचे सांगितले. 15 जुलैला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी येणार आहेत. यावेळी व्यासपीठावर जाऊन गायकर यांची तक्रार अजित पवारांकडे करत. त्यांना उमेदवारी का दिली या जाब विचारणार असल्याचे दशरथ सावंत यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले आहे. Agasti karkhana Election News Update

दशरथ सावंत म्हणाले, जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत मी राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार यांच्या शब्दाला मान देऊन माघार घेतली होती.मात्र अगस्ती कारखाना निवडणुकीत सीताराम गायकर याना नेतृत्व व उमेदवारी देऊ नये या अटीवर माघार झाली मात्र गायकर यांची पिलावळ लुंगे सुंगे बाजार बुणगे म्हणतात सावंत यांनी माघार घेण्यासाठी काही तरी घेतले. येत्या 15 तारखेला अजित पवार येणार आहेत त्यांना जाब विचारण्यासाठी मी स्टेजवर जाणार आहे. मला स्टेजवर जाऊ दिले नाही तर तालुक्याला माझे प्रेत दिसेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

ते पुढे म्हणाले की, जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष असताना नोकर भरतीत घोटाळा करून तोच पैसा आज अगस्ती निवडणुकीत वापरला जात आहे. मागील दोन वर्षांपासून आम्ही अगस्ती कारखान्यात चालू असलेला गोंधळ जनतेसमोर सभासदसमोर मांडत आहोत. त्यासाठी अगस्ती निवडणुकीत परिवर्तन पॅनल उभा केला. मात्र तिरंगी लढत झाली तर गायकरांची टोळी निवडणुकीत यशस्वी होऊन चुकीच्या लोकांच्या ताब्यात कारखाना जाईल असे लक्षात आले. त्यात माजी मंत्री पिचड यांचा जिल्हा बँकेत काही संबंध नाही, अगस्तीमध्ये गायकर यांचा सहभाग अधिक आहे. पिचड यांच्या पॅनलमध्ये चांगले तरुण उभे आहेत, याबाबत आमच्या काही सूचना होत्या. त्या आम्ही माजी मंत्री पिचड यांच्यासमोर मांडल्या त्यांचा सकारात्मक होकार आल्यावर आम्ही निर्णय घेऊन परिवर्तन पॅनलला पाठिंबा दिला, असे त्यांनी सांगितले.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मला फोन आल्यानंतर आम्ही आमदार डॉ. किरण लहामटे, बी.जे.देशमुख, विनय सावंत, अशोक भांगरे यांच्या समवेत अजित पवार यांना भेटायला गेलो. त्यावेळी मी माझी भूमिका मांडताना सीताराम गायकर यांना कारखाना निवडणुकीत नेतृत्व अथवा उमेदवारी देऊ नका. मी तुमचा मान राखून माघार घेतो. त्यावर अजित पवार यांनी कारखाना निवडणुकीत एकत्र बसून उमेदवारी बाबत निर्णय घेऊ मात्र नंतर निवडणूक लागल्यानंतर आमचे सोबत असणारे गायकर यांनी आपल्याकडे घेतले. त्यांच्या पिलावळी ने मला काही तरी मिळाले असा अपप्रचार केला. त्यासाठी येत्या 15 तारखेला अजित पवार, बाळासाहेब थोरात येत असून त्यांना मी जाब विचारण्यासाठी त्यांच्या स्टेजवर जाणार आहे. मला स्टेजवर येऊ दिले नाही तर माझे मृतदेह तालुक्याला दिसेल असा इशारा सावंत यांनी दिला आहे.

या पत्रकार परिषदेला निवृत्त प्रशासकीय अधिकारी बी.जे. देशमुख, बाजीराव दराडे, सोमनाथ थोरात, रवी मालुंजकर, भाऊसाहेब नवले, राक्षे उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT