Veteran MES leader Deepak Dalvi, who spearheaded the Maharashtra-Karnataka border struggle for over seven decades, breathed his last today. Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Deepak Dalvi : सीमाप्रश्न जिवंत ठेवणारा वाघ हरपला : महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांचे निधन

Deepak Dalvi : सीमावादाचे ज्येष्ठ नेते आणि मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी (८४) यांचे निधन झाले.

Hrishikesh Nalagune

Deepak Dalavi : मागील तब्बल ७० वर्षांपासून धगधगणाऱ्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमालढ्याचे ज्येष्ठ नेते, मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांचे आज (मंगळवार, १७ मार्च) वृद्धापकाळाने निधन झाले. ८४ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी ७.३० वाजता शहापूर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे.

दीपक दळवी मागील अनेक वर्षांपासून मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळत होते. सीमाभागातील ८६५ गावे महाराष्ट्रात सामील व्हावीत, या मागणीसाठी हा संघर्ष होता. कर्नाटक सरकारकडून सीमाभागात होणाऱ्या अन्यायाविरोधात त्यांनी नेहमीच आक्रमक भूमिका घेतली. दिवंगत नेते एन.डी. पाटील यांचीही दळवी यांना खंबीर साथ लाभली.

डिसेंबर २०२१ मध्ये बेळगाव येथे त्यांच्यावर कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी शाईफेक केली होती. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. दळवी यांना अनेकदा बेळगाव पोलिसांनी अटकही केली होती. १ नोव्हेंबर रोजी कर्नाटक राज्योत्सवाच्या दिवशी दरवर्षी महाराष्ट्र एकीकरण समिती 'काळा दिवस' पाळते. या आंदोलनांचे नेतृत्व अनेक वर्षे दीपक दळवी यांनी केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT