

Kolhapur News: कोल्हापूर जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेस कडून शिल्पा खोत या अध्यक्ष तर उपाध्यक्षपदावर भाजपच्या तानाजी पाटील यांची निवड झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला अध्यक्षपदासाठी संमती दिली असली तरी शेवटपर्यंत डॉ.आमदार विनय कोरे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष करण्यासाठी विरोध राहिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यरात्री फोन करत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या बाजूने कौल दिला. त्यामुळे शेवटच्या दिवसापर्यंत ताणल्या गेलेल्या अध्यक्षपदावर राष्ट्रवादी काँग्रेसने मोहोर उमटवली.
कोल्हापूर जिल्हा परिषदेवर कोणाचा अध्यक्ष होणार यावरून महायुतीमध्ये गेल्या महिनाभरापासून दावा प्रतिदावा सुरू होता. त्यामुळे अध्यक्षपदाचा वाद हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोर्टात गेल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला की भाजपला अध्यक्षपद मिळेल याबाबत उत्सुकता लागून राहिली होती.
तत्पूर्वी मुंबईत झालेल्या बैठकीत आमदार विनय कोरे यांनी भाजपचाच अध्यक्ष करावा अशी भूमिका घेतली होती. प्रत्यक्ष मंत्री हसन मुश्रीफ यांच्या भूमिकेला कोरे यांचा विरोध होता. त्यामुळे महायुतीच्या नेत्यांच्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस जो निर्णय घेतील? तो सर्वांना मान्य असेल असा निर्णय घेण्यात आला होता.
मात्र, त्यानंतरही आमदार कोरे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसला विरोध असल्याचे सांगितले जात होते. रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विवाह सोहळ्याच्या निमित्ताने कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यामध्ये महापालिकेच्या सूत्रानुसार राष्ट्रवादी काँग्रेसला अध्यक्षपद मिळावे, अशी भूमिका महायुतीच्या नेत्यांनी घेतल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला अध्यक्ष पद देण्याला संमती दिली होती. तर मंत्री हसन मुश्रीफ यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत कागलमधील कासव धबधब्याचे उद्घाटन केले. त्या सोहळ्याप्रसंगी मंत्री मुश्रीफ आणि कोरे एकत्र दिसले. मात्र, तरीही आमदार कोरे यांचा विरोध राहिला.
अध्यक्षपदाची निवडणूक आज मंगळवारी होत असताना सोमवारी महायुतीतील सर्वच सदस्य हे पन्हाळगडावर मुक्कामी गेले. मात्र भाजपकडून अध्यक्ष करण्यासाठी दबाव वाढत चालला होता. त्यामुळे पन्हाळगडावर रात्रभर पदाधिकाऱ्यांमध्ये खलबत्ते सुरू होती.
भाजपकडून पहिला अध्यक्ष व्हावा अशी भूमिका घेतली जातं होती. त्यामुळे सुयेशा घाटगे यांना कोल्हापुरतच थांबण्याच्या सूचना भाजपच्या नेत्यांकडून दिल्या होत्या. रात्री उशिरापर्यंत जिल्हा परिषदेच्या सर्व सदस्यांना अध्यक्ष पदाबाबत कोणता निर्णय झाला आहे. याची कल्पना नव्हती.
कागलमधील कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आलेले मंत्री मुश्रीफ आणि आमदार कोरे यांच्याबाबत गैरसमज दूर झाले. सोमवारी मध्यरात्री सुमित कदम आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी चर्चा केली. कदम यांना थेट मुख्यमंत्री फडणवीस यांनी संपर्क करत माहिती घेतली. त्यानंतर आमदार कोरे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यात चर्चा केली. या चर्चेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष करण्यासाठी सकारात्मक असल्याचा निरोप आमदार कोरे यांनी दिला. त्यानंतर कदम यांनी मंत्री मुश्रीफ यांच्याशी चर्चा करून सहमती दर्शवल्याची माहिती समोर आली.
त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क करून राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष करण्यासाठी सकारात्मक असल्याचा निरोप दिला. त्यानंतर कदम यांनी मंत्री मुश्रीफ यांच्याशी चर्चा करून सहमती दर्शवल्याची माहिती समोर आली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.