अहमदनगर - शिर्डी येथे आज शिवसेनेचे नेते तथा माजी गृहराज्य मंत्री दीपक केसरकर ( Deepak Kesarkar ) यांनी साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी उपस्थित पत्रकारांशी संवाद साधताना राज्यातील खालावलेल्या राजकीय पातळी विषयी आपले मत व्यक्त केले. ( Deepak Kesarkar said, accusation is not the culture of Maharashtra ... )
दीपक केसरकर म्हणाले, कोरोना संकटामुळे अनेक वर्षांनी साईबाबांचे दर्शन होत आहे, याचा आनंद होत आहे. कोरोनामुळे शिस्तबद्ध दर्शन होणे आवश्यक आहे. त्यासाठी दर्शनाच्या रांगेत बदल करण्यात आले आहे. त्यामुळे लोकांना सहज दर्शन मिळत आहे. त्यामुळे साई भक्तांमध्ये समाधान आहे.
ते पुढे म्हणाले, राज्यातील राजकारणाची पातळी खालावलेले आरोप-प्रत्यारोप ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. हे कुठे तरी थांबले पाहिजे. त्यासाठी मी साईबाबा चरणी प्रार्थना करेल. शेवटी आपल्याला विकासाच्या दिशेने जायचे आहे. महाराष्ट्राला वेगळा सांस्कृतिक व सामाजिक वारसा आहे. तो जपण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे. त्यामुळे राज्य करत असताना राज्य चांगले कसे राहील यासाठी सकारात्मक सूचना दिल्या पाहिजेत. जर खालच्या पातळीवर जाऊन टीका होऊ लागली तर त्याला उत्तर येते. त्यातून परिस्थिती बिघडते, असे त्यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्रातील राजकारणाला जी प्रगल्भता होती. जी उंची होती ती कायम राखली पाहिजे. वडीलधाऱ्यांचा आदर राखणे ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. त्यांचा अनादर करणे ही महाराष्ट्राची संस्कृती कधीही नव्हती. ती असू नये असे मला वाटते. महाराष्ट्र हे देशाला दिशा देणारे राज्य आहे. देशातील सामाजिक व सांस्कृतिक चळवळींची सुरवात महाराष्ट्रातून झाली आहे. महाराष्ट्राचे ते स्थान अबाधित रहायचे असेल तर महाराष्ट्राच्या संस्कृतीचे रक्षण झाले पाहिजे. तिथल्या सामाजिक परंपरा तशाच राखल्या गेल्या पाहिजे. ही सर्वांची जबाबदारी आहे, असे केसरकर यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.