Deepak Salunkhe Patil, Shahaji Bapu Patil: Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

ShahajiBapu Patil News : सांगोल्यात मोठा ट्विस्ट, अजित पवारांच्या नेत्यानं वाढवली शहाजीबापूंची धडधड,विधानसभा लढण्याविषयी मोठे संकेत

NCP Leader Deepak Salunkhe Big Statement On Sangola Assembly Election 2024: 'जे कार्यकर्त्यांच्या मनात तेच माझ्याही मनात असं म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांना कामाला लागा...'

Deepak Kulkarni

Sangola News : लोकसभा निवडणुकीतल्या जिव्हारी लागलेल्या पराभवानंतर हेवे-दावे, आरोप- प्रत्यारोपांनी महायुतीत फार काही आलबेल सुरू आहे असं नाही. पण याही परिस्थितीत भाजप, शिवसेना शिंदे गट,राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या तीनही पक्षांचे प्रमुख नेतेमंडळी विधानसभा निवडणुकीला महायुती म्हणूनच सामोरे जाणार असल्याचा दावा करत आहे.

पण महायुतीतील घटक पक्षांचे विद्यमान-माजी आमदार, स्थानिक कार्यकर्ता, पदाधिकारी, यांमध्ये मात्र कमालीची अस्वस्थता असून काही झालं तर आता मागं हटायचं नाही , असा ताठ बाणा त्यांनी घेतल्याचे दिसून येत आहे. तसेच वैयक्तिक पातळीवर ही इच्छुक मंडळी विधानसभेच्या तयारीलाही लागली आहे. आता सोलापूर जिल्ह्यातील बहुचर्चित सांगोला मतदारसंघातही मोठा ट्विस्ट समोर आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यानं आमदार आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते शहाजीबापू पाटील यांची धडधड वाढवली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्ता संवाद बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याविषयी मोठे संकेत दिले आहे.ते सध्या महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit Pawar) गटात आहे. या बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष तानाजी पाटील, माजी उपनगराध्यक्ष शिवाजी बनकर, चारुशीला काटकर, मधुमती साळुंखे, पंढरपूर तालुक्यातील समाधान काळे यांसह मोठ्या प्रमाणात पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

सांगोल्यात सध्या शिवसेना शिंदे गटाचा आमदार आहे. शहाजीबापू पाटलांनी (ShahajiBapu Patil) 2019 ला विधानसभा निवडणूक लढवली आणि जिंकली आहे.त्यामुळे अजित पवार गटाच्या साळुंखे यांनी प्रत्यक्ष विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली नसली तरी त्यांनी ते शर्यतीत असणार असल्याचे अप्रत्यक्ष संकेत दिले आहे. जे कार्यकर्त्यांच्या मनात तेच माझ्याही मनात असं म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांना कामाला लागा असे आदेश दिले आहेत.

या बैठकीत कार्यकर्त्यांनी यंदा विधानसभेची निवडणूक आपणच लढवायची असा आग्रह धरला.आता आबा आपण कुणाला पाठिंबा द्यायचा नाही, ज्यांना द्यायचा आहे त्यांनी आपल्याला पाठिंबा द्यावा.यावेळी आर या पारची लढाई लढाईची आहे असे कार्यकर्त्यांनी निक्षून सांगितले.

कार्यकर्त्यांच्या आग्रही मागणीवर दीपक साळुंखे म्हणाले, आजपर्यंत मी सांगेल ते तुम्ही ऐकत आलात. यापुढील काळात माझ्या शब्दावर डोळे झाकून विश्वास ठेवणाऱ्या कार्यकर्त्यांच्या शब्दाच्या पुढे जाणार नाही.तुम्ही जी भूमिका ठरवाल, तसा मी निर्णय घेणार आहे. जे कार्यकर्त्यांच्या मनात आहे तेच माझ्याही मनात आहे.आगामी विधानसभेचा रणसंग्राम डोळ्यासमोर ठेवून कामाला लागावे असे आदेशही माजी आमदार दीपक साळुंखे यांनी दिले आहेत.

साळुंखे म्हणाले,गेली 35 वर्ष मी जो आदेश देईल तो कोणताही प्रतिप्रश्न न करता प्रामाणिकपणे पाळणारे कार्यकर्ते हेच माझे राजकीय भांडवल आहेत. या पुढील काळात कार्यकर्त्यांना मी कोणताही आदेश देणार नाही तर कार्यकर्ते जी भूमिका ठरवतील तो निर्णय घेणार आहे असे स्पष्ट करत एकप्रकारे विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचेच संकेत दिले आहे.त्यामुळे शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार शहाजीबापू पाटलांचे टेन्शन वाढले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT