Uddhav Thackeray : विदर्भात राजकीय घडामोडींना वेग, ठाकरे गटाच्या इच्छुकांचा पत्ता कट;'आमदारकी'चा मार्ग खडतर ?

Uddhav Thackeray on Vidhan Parishad News : सध्या परब यांनी मुंबई पदवीधरमधून निवडणूक लढवली आहे. त्यांचा निकाल अद्याप यायचा आहे. मनीषा कायंदे शिंदे यांच्यासोबत गेल्या आहेत.
 Uddhav Thackeray
Uddhav Thackeraysarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या विधान परिषदेसाठी विदर्भातून इच्छुक असलेल्या उमेदवारांचा विषय आता संपल्यात जमा झाला आहे. ठाकरे गटाकडे पंधरा आमदार असून विजयासाठी 23 आमदारांची गरज आहे. हे बघता ठाकरे आणि शरद पवारांना एकत्रित निर्णय घ्यावा लागणार आहे.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी विदर्भातून विधान परिषदेवर एक उमेदवार पाठवण्याची इच्छा दर्शवली होती. काही पदाधिकाऱ्यांना त्यांनी तसा शब्द दिला होता. विधान परिषद सदस्य मनिषा कायंदे आणि अनिल परब यांच्या जागा रिक्त झाल्या आहेत. कायंदे यांच्या जागी विदर्भातून एकाचा विचार केला जाईल असा शब्द उद्धव ठाकरे यांनी दिला होता. शिवसेनेने आजवर विदर्भाकडे दुर्लक्ष केले.

 Uddhav Thackeray
Mahavikas Aghadi : 'मविआ'त ठिणगी! प्रज्ञा सातव यांच्यावर कारवाई करा, ठाकरेंच्या खासदाराची काँग्रेसकडे तक्रार; कारण...

भाजपसाठी (BJP) अधिक जागा सोडणे ही आमची चूक झाली. ती सुधारण्यात येईल, असेही ठाकरे म्हणाले होते. सध्या परब यांनी मुंबई पदवीधरमधून निवडणूक लढवली आहे. त्यांचा निकाल अद्याप यायचा आहे. मनीषा कायंदे शिंदे यांच्यासोबत गेल्या आहेत.

विधान परिषदेची निवडणूक जाहीर होताच अनेक इच्छुकांनी भेटीगाठी वाढवल्या होत्या. काहींनी ठाकरे यांचीसुद्धा भेट घेतली होती. काही जणांनी प्रसिद्धी माध्यमातून आपली नावे रेटली होती. माजी खासदार व जिल्हाप्रमुख प्रकाश जाधव, माजी जिल्हा प्रमुख व पूर्व विदर्भाचे सह संघटनमंत्री सतीश हरडे, अमरावतीचे सुधीर सूर्यवंशी आणि जयदीप पेंडके यांची नावे याकरिता आघाडवीर होती.

 Uddhav Thackeray
Anil Deshmukh : ‘हिट अँड रन' प्रकरणात अनिल देशमुखांचा देवेंद्र फडणवीसांवर निशाणा, 'सात तास रक्त...'

संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या जवळचे असल्याने पेंडके यांच्या नाव मुंबईतूनच लिक करण्यात आले होते. काही माध्यमांनी ब्रेकिंग न्यूज दाखवल्या होत्या. सध्या विधान सभेत 278 आमदार आहेत. यानुसार विधान परिषदेसाठी 23 आमदारांच्या मतांची गरज भासणार आहे. शिंदे 40 आमदार घेऊन बाहेर पडल्याने उद्धव ठकरे यांच्याकडे 15 आमदार शिल्लक आहे. विधान परिषदेत उमेदवार निवडून आणण्यासाठी आठ आमदारांची त्यांना गरज भसणार आहे. शरद पवार गटाकडे 10 आमदार आहेत. पवारांचा कल शेकापचे जयंत पाटील यांच्याकडे आहे. हे बघता विदर्भातील इच्छुकांना संधी मिळणे सध्या अशक्य वाटत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com