Sushilkumar Shinde Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Delimitation Bill : काँग्रेसच्या बड्या नेत्याची भूमिका : ‘डिलिमिटेशन व्हायलाच पाहिजे; पण....’

Sushilkumar Shinde Statement : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी पक्षाच्या विरोधी भूमिकेपेक्षा वेगळे मत मांडत डिलिमिटेशनचे समर्थन केले. लोकसंख्यावाढीनुसार लोकप्रतिनिधित्व वाढले पाहिजे, असे त्यांचे मत आहे.

विश्वभूषण लिमये

Solapur, 28 November : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची डिलिमिटेशनबाबत काय भूमिका आहे, याबाबत मी काय बोलणार, त्यांचा आणि माझा पक्ष वेगळा आहे. काँग्रेस पक्षाचा डिलिमिटेशनला विरोध आहे. पण माझं मत आहे की, डिलिमिटेशन झालं पाहिजे. तसाही खूप वेळ गेला आहे, लोकसंख्या जशी वाढते, तसे प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे. त्यामुळे ते (डिलिमिटेशन) होणे जरुरीचे आहे, अशी भूमिका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी मांडली.

दरम्यान, काँग्रेस पक्षाचा डिलिमिटेशनच्या बिलाला विरोध आहे. खासदार प्रणिती शिंदे यांनीही डिलिमिटेशनच्या बिलाला विरोध दर्शविला आहे. त्यामुळे प्रणिती शिंदे यांच्या भूमिकेच्या विरोधात घरातूनच सुशीलकुमार शिंदे यांनीच सूर लावला आहे, त्यामुळे ज्येष्ठ नेतेमंडळी डिलिमिटेशनच्या बाजूने असल्याचे दिसून आहे.

ते म्हणाले, जनगणनेनंतर डिलिमिटेशन व्हावे, ही आमच्या पक्षाची भूमिका आहे. काळ पुढे गेला आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. करायचं असेल तर करा; पण ते सर्वसंमतीने झालं असतं तर बरं झालं असतं.

द्रविड प्रांताच्या विभाजनाबाबत सुशीलकुमार शिंदे म्हणाले, भाजपच्या मनात नेमकं काय चाललं, हे माहिती नाही.ते काही बोलतच नाहीत तर काय कळणार. पण असं विभाजन होणार असेल तर बाबासाहेबांनी संविधान सभेत जो विचार मांडला होता, त्याला धोका पोहोचेल.

काँग्रेसच्या तरुण नेत्यांकडून होणाऱ्या विधानाबाबतही सुशीलकुमार शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. प्रत्येकाचा विचार वेगळा असतो. पण, मी दुसऱ्या पक्षाविषयी बोलणार नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान सभेत जे सांगितले होते. त्याच्या विरोधात काम होत असेल तर ते देशासाठी धोकादायक आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT