Solapur Commissioner's Office Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur Police : सोलापूर पोलिसांचा दणका; लोकसभा मतदानाच्या तोंडावर राजकीय नेत्यांसह 32 जण हद्दपार

Lok Sabha Election 2024 : या 32 जणांवर एकपेक्षा अनेक गुन्हे दाखल आहेत, ते रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. सध्या लोकसभेची निवडणूक सुरू आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई न केल्यास निवडणूक शांततेत पार पाडणे अशक्य आहे. त्यामुळे या 32 जणांची याचिका रद्द करण्यात यावी, असा युक्तीवाद सरकारी वकील राजपूत यांनी केला.

Vijaykumar Dudhale

Solapur, 05 May : सोलापूरमधील 32 जणांना लोकसभेचे मतदान होईपर्यंत शहरातून हद्दपार करण्याचा निर्णय जिल्हा व सत्र न्यायालयाने कायम ठेवला आहे, त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि एमआयएम पक्षातील 32 जणांना हद्दपार करण्याचे आदेश सोलापूर जिल्हा प्रशासनाने काढले आहेत. या 32 जणांवर एकापेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत.

रियाज हुंडेकरी, अंबादास करगुळे, अजहर रामपुरे, मोहसीन बागवान, मैनुद्दीन हत्तुरे, वाहिद विजापुरे, इलियास हुंडेकरी, गाजी जहागीरदार, वाजिद सालार, असिफ तुळजापुरे, इफ्तेकार तुळजापुरे, करमुल शेख, मोहसीन नदाफ,सादिक कुरेशी, अलीमुद्दीन कुरेशी, इब्राहिम कुरेशी, अल्ताफ कुरेशी, मतिन शेख, मो. सादिक शेख, तौफिक शेख, सोहेल कुरेशी, इरफान शेख, तौफिक हत्तुरे, गौस नालबंद, आरिफ नालबंद, मोईनुद्दीन नाईकवाडी, अबुबकर नाईकवाडी, तौसिफ नाईकवाडी, शहानवाज नाईकवाडी, उमर नाईकवाडी, अबुरिहान नाईकवाडी, मकबूल नाईकवाडी यांचा हद्दपारीमध्ये समावेश आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सोलापूरचे (Solapur) पोलिस उपायुक्त विजय कबाडे यांनी एकपेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेल्या 32 जणांवर लोकसभा निवडणुकीच्या (Lok sabha election) पार्श्वभूमीवर हद्दपारीची कारवाई केली होती. त्यांना सोलापूर शहरात 27 एप्रिल रोजी सायंकाळी सहा ते सात मे म्हणजेच मतदानाच्या दिवशी रात्री 12 पर्यंत या कालावधीत प्रवेशास मनाई केली होती. या ३२ जणांना तशा नोटिसाही बजावण्यात आल्या होत्या. या कारवाईच्या विरोधात या 32 जणांनी न्यायालयात धाव घेतली होती.

आमच्या मूलभूत हक्काचा भंग झाला आहे, त्यामुळे पोलिस प्रशासनाचा आदेश रद्द करण्यात यावा, अशी मागणी रियाज हुंडेकरी, गाजी जहागीरदार, तौफिक शेख, वाजिद सालार, आसिफ तुळजापुरे, तौफिक हत्तुरे, तौफिक शेख यांच्यासह 32 जणांनी न्यायालयाकडे केली होती. त्याविरोधात जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंह राजपूत यांनी युक्तिवाद केला.

लोकसभा मतदानाच्या दिवशी सकाळी नऊ ते दुपारी 12 या वेळेत मतदानासाठी शहरात येण्याची मुभा पोलिस उपायुक्तांनी आदेशात दिली आहे. त्यामुळे त्यांच्या मूलभूत हक्काला बाधा येणार नाही. या 32 जणांवर एकपेक्षा अनेक गुन्हे दाखल आहेत, ते रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. सध्या लोकसभेची निवडणूक सुरू आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई न केल्यास निवडणूक शांततेत पार पाडणे अशक्य आहे. त्यामुळे या 32 जणांची याचिका रद्द करण्यात यावी, असा युक्तीवाद सरकारी वकील राजपूत यांनी केला.

सरकारी वकिल राजपूत यांचा युक्तिवाद ग्राह्य मानून जिल्हा व सत्र न्यायाधीश योगेश राणे यांनी ही याचिका रद्द केली. त्यामुळे त्यांच्यावरील हद्दपारीची कारवाई कायम झाली आहे, त्यामुळे ऐन मतदानाच्या तोंडावर 32 जणांना सोलापूर शहरातून हद्दपार व्हावे लागणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT