Sangli Lok Sabha : विश्वजित कदम वाघच; पण सांगलीत वारं फिरलंय, माझा विजय निश्चित : विशाल पाटलांचा राऊतांना टोला

Lok Sabha Election 2024 : आम्ही सांगलीत वसंतदादा पाटील नावाचा वाघ यापूर्वी पाहिला आहे. वाघाचा स्वभाव, वाघाची रचना वेगळी असते. विश्वजित कदम हे नक्कीच वाघ असतील, पण ते वाघ आहेत की नाहीत, हे चार जूनला कळेल. त्यांनी मोठ्या ताकदीने सांगलीतून चंद्रहार पाटलांना विजयी केलं तरच आम्ही त्यांना वाघ असल्याची पदवी देऊ, असं म्हटलं होतं. त्याला विशाल पाटील यांनी उत्तर दिलं आहे.
Sanjay Raut-Vishwajeet Kadam-Vishal Patil
Sanjay Raut-Vishwajeet Kadam-Vishal PatilSarkarnama

Sangli, 05 May : काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम हे सांगलीचे तर वाघ आहेतच, पण उद्या ते राज्याचेही वाघ होताना दिसतील. संजय राऊतांना वाघ बाहेर कसे शिकार करतो, हे कदाचित माहीत नसावं. त्यांनी एखाद्या चॅनेलची डॉक्युमेंटरी बघावी. कारण, वाघ संधी बघून झडप घालतो, असा टोला काँग्रसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांनी खासदार संजय राऊत यांना लगावला.

दरम्यान, विश्वजित कदम (Vishwajeet Kadam) यांना नाहक बदनाम करण्याचे आणि घेरण्याचा प्रयत्न केला जात आहे. सांगली लोकसभेत वारं फिरलं नाही, तर वाऱ्याचे आता वादळ झाले आहे, त्यामुळे सांगलीतून आपला विजय निश्चित आहे, असा विश्वासही विशाल पाटलांनी (Vishal Patil) व्यक्त केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sanjay Raut-Vishwajeet Kadam-Vishal Patil
Ranjeetsingh Nimbalkar News : खासदार निंबाळकरांनी मोहिते-पाटलांच्या मुळावरच घाव घातला; रणजितसिंह यांच्यावरही बसरले

सांगलीत महविकास आघाडीत शिवसेनेकडून डब्बल केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे, त्यामुळे काँग्रेसकडून इच्छूक असलेले विशाल पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यांना वंचित बहुजन आघाडीने पुरस्कृत केले आहे. मात्र, आमदार विश्वजित कदम हे वाघ असतील तर त्यांनी चंद्रहार पाटील यांना निवडून आणावे, असे आव्हान खासदार संजय राऊत यांच्याकडून देण्यात आले आहे.

आम्ही सांगलीत वसंतदादा पाटील नावाचा वाघ यापूर्वी पाहिला आहे. वाघाचा स्वभाव, वाघाची रचना वेगळी असते. विश्वजित कदम हे नक्कीच वाघ असतील, पण ते वाघ आहेत की नाहीत, हे चार जूनला कळेल. त्यांनी मोठ्या ताकदीने सांगलीतून चंद्रहार पाटलांना विजयी केलं तरच आम्ही त्यांना वाघ असल्याची पदवी देऊ, असं म्हटलं होतं. त्याला विशाल पाटील यांनी उत्तर दिलं आहे.

विशाल पाटील म्हणाले, विश्वजीत कदम हे वाघच आहेत आणि संजय राऊतांना वाघ शिकार कशी करतो, हे कदाचित माहीत नसावं. त्यांनी एखाद्या चॅनेलची डॉक्युमेंटरी बघावी. कारण वाघ संधी बघून झडप घालतो. संजय राऊत हे गेली महिनाभर काय आणि का बोलतात? याचा उलगडा निवडणूक झाल्यावर होईल. सांगली लोकसभा निवडणुकीत वाऱ्याचे वादळ झालंय, त्यामुळे माझा विजय निश्चित आहे.

Sanjay Raut-Vishwajeet Kadam-Vishal Patil
Solapur News: सोलापूरसाठी वडिलांनी 40 वर्षांत काहीही केलं नाही, त्यांची लेक काय करणार?

विश्वजीत कदम हे काँग्रेस पक्षाचे भविष्य आहेत. ते महाराष्ट्र आणि देशाचं भविष्य आहेत. विश्वजित कदम यांच्यावरील टीका ही आमचा सर्वसामान्य कार्यकर्ता सहन करणार नाही. संजय राऊत हे विश्वजित कदम यांच्यावर का आणि कशासाठी बोलतात, हे कळत नाही. विश्वजित कदम हे सांगलीचे वाघ तर आहेत, पण उद्या ते राज्याचेही वाघ होताना दिसतील. कदम हे एक प्रभावी नेतृत्व आहे. सांगलीबाबत जाणूनबुजून जे काही झालं आहे, या नेतृत्वाला पुढे येता येऊ नये, त्यांना अडचणीत आणण्यसाठी सांगलीचा वाद झालेला आहे.

Sanjay Raut-Vishwajeet Kadam-Vishal Patil
Abhijeet Patil : पंढरपूरच्या विठ्ठल कारखान्यावर प्रथमच भाजप नेत्याची सभा; फडणवीसांसाठी अभिजित पाटलांचा पुढाकार

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com