Eknath Shinde and Devendra Fadnavis Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांची प्रायोरिटी वेगवेगळी, आम्ही छोटी माणसं; फडणवीसांचा कट्टर समर्थक नेता असं का म्हणाला ?

Deepak Kulkarni

विशाल वामनराव पाटील

Karad News : आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला 25 वर्षे पूर्ण होत असल्याने महामंडळाचे अध्यक्ष आणि भाजप नेते नरेंद्र पाटील यांनी फेसबुकद्वारे लाइव्ह संवाद साधला. या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर नाराजी व्यक्त करत मुख्यमंत्री सातारा जिल्ह्याचे असून, त्यांची प्रायोरिटी वेगवेगळी असल्याने मला 10-15 दिवस भेटण्यासाठी लागतात. त्यांच्या प्रायोरिटीमध्ये आण्णासाहेब पाटील महामंडळ दिसत नसल्याची टीका पाटलांनी या वेळी केली.

माथाडी नेते आणि भाजपचे नेते असलेल्या नरेंद्र पाटील यांनी आपल्या फेसबुक लाइव्ह संवादात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत नाराजी व्यक्त केली, तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले.

नरेंद्र पाटील (Narendra Patil) म्हणाले, "महामंडळाच्या कामकाजात अजून आधुनिकता आणण्यासाठी कार्यालय इमारत उभारणीसाठी नवी मुंबईत आम्ही 5 जागेची मागणी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सातारा जिल्ह्यातील आहेत. ते खूप बिझी असतात, त्यांची भेट घेण्यास मलाही 10-15 दिवस उजाडतात. त्यांचा प्राधान्यक्रम वेगळा आहे. त्यात आज महामंडळ दिसत नाही.

बुधवारी महामंडळाला 25 वर्षे पूर्ण होत असताना ते विशेष कार्यक्रम घेऊ शकले असते. आज त्या जागेची पूर्तता करून भूमिपूजनही घेता आले असते. मात्र, मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांना व्यस्त कामामुळे येता आले नाही. हरकत नाही, आम्ही छोटी माणसे आहोत."

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

फडणवीसांचे कौतुक करताना म्हणाले...

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात महामंडळाची पुनर्रचना करण्यात आली. त्यांनी आर्थिक तरतूद आणि व्याप्ती वाढवली. देवेंद्र फडणवीस यांचे आम्हाला नेहमी सांगणे असते, त्याप्रमाणे महामंडळाची वाटचाल सुरू आहे. देवेंद्र फडणवीसांनी या महामंडळाला न्याय दिला असून, माझं त्यांना एवढं सांगणं आहे, मुख्यमंत्र्यांना त्याची जाणीव करून द्यावी.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी या महामंडळाचा चेहरामोहरा बदलला. खरं म्हणजे आज मुख्यमंत्री एक विशेष कार्यक्रम घेऊ शकले असते, असेही ते म्हणाले.

माझ्या वडिलांच्या नावाने सुरू असलेल्या महामंडळाचे अध्यक्षपद मिळाल्यामुळे मला काम करण्याची संधी मिळाली. ही गोष्ट माझ्यासाठी भाग्याची आहे. आम्हाला 70 हजार मराठा उद्योजक उभे करण्यात यश आले असून, आता एक लाख मराठा उद्योजक उभे करायचे आहेत, असेही ते म्हणाले.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT