Narendra Patil: राष्ट्रवादीच्या आमदारासाठी भाजपचे माजी आमदार मैदानात ; शिंदेंसाठी नरेंद्र पाटील करणार APMC मार्केट बंद...

APMC News: एपीएमसी मार्केट बंद करून पोलिस ठाण्यावर मोर्चा काढणार असल्याचा इशारा माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी दिला आहे
Narendra Patil, Shashikant Shinde
Narendra Patil, Shashikant ShindeSarkarnama

Navi Mumbai: नवी मुंबई एपीएमसीमध्ये झालेल्या शौचालय घोटाळा प्रकरणी माथाडी नेते आमदार शशिकांत शिंदे यांना जाणीवपूर्वक टार्गेट करण्यात येत आहे. या घोटाळ्यात चेअरमन, संचालक व प्रशासकीय अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, या घोटाळ्याचा मुख्यसूत्रधार यांची नावे ताबडतोब घेण्यात यावीत यासाठी एपीएमसी मार्केट बंद करून पोलिस ठाण्यावर मोर्चा काढणार असल्याचा इशारा माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी दिला आहे.

एपीएमसी शौचालय घोटाळ्यात गुन्हा दाखल करताना दुजाभाव केला जात असून मुख्य आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप माथाडी कामगार नेते आणि माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी केला आहे. यामध्ये जाणीवपूर्वक आमदार शशिकांत शिंदे यांना टार्गेट केले जात असल्याचेही म्हटले आहे. त्यामुळे माथाडी कामगार नेते आणि एपीएमसी संचालक मंडळ अधिकारी हे आमने-सामने आल्याचे पाहायला मिळत आहे.

((राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Narendra Patil, Shashikant Shinde
Rohit Pawar: युवा संघर्ष यात्रेतच MCAचे अध्यक्ष रोहित पवार पाहणार फायनल मॅच..

मुंबईतील एपीएमसी शौचालय घोटाळ्यात आठ जणांवर 7 कोटी 61 लाख रुपये प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते आणि विधान परिषद सदस्य शशिकांत शिंदे यांचाही समावेश आहे. परंतु,आता भाजप नेते नरेंद्र पाटील यांनी राष्ट्रवादीच्या शशिकांत शिंदे यांच्यासाठी मार्केट बंद करण्याचा इशारा दिला आहे.

कराड येथे माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी माध्यमांना एपीएमसी शौचालय बाबत माहिती दिली. माथाडी नेते नरेंद्र पाटील म्हणाले, शौचालय घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार संचालक मंडळ आणि अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला नसून कामगार प्रतिनिधी असलेल्या शशिकांत शिंदे यांना टार्गेट केले जात असल्याचे म्हटले आहे.

त्यामुळे भाजपमध्ये असलेले नरेंद्र पाटील शशिकांत शिंदेंची बाजूने उभे राहिल्याचे चित्र दिसत आहे. या घोटाळ्याबाबत संचालक मंडळ आणि अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल न केल्यास एपीएमसी मार्केट बंद करण्याचा इशारा दिला आहे. तसेच एपीएमसी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढणार असल्याचेही नरेंद्र पाटील यांनी म्हटले आहे.

Narendra Patil, Shashikant Shinde
Dhangar Reservation: धनगर समाज आक्रमक; हिवाळी अधिवेशनात मोर्चा धडकणार

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com