Amit Shah, devendra fadnavis, Eknath Shinde And Ajit Pawar  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Ajit Pawar : शिंदेंची अमित शाहांकडे तक्रार? अजितदादांनी एका वाक्यात विषय संपवला, म्हणाले... “मला असं…”

Ajit Pawar On Eknath Shinde : रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या 345 व्या पुण्यतिथी निमित्ताने कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र आता या कार्यक्रमात रायगड जिल्ह्यातील पालकमंत्रिपद आणि शिवसेना-राष्ट्रवादीतील फायलीच्या मुद्यावरील धुसफूस समोर आली आहे.

Aslam Shanedivan

Satara News : महायुतीचे सरकार सत्तेवर आले असून रायगडसह नाशिकमधील पालकमंत्रिपदाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. तर शिवसेना-राष्ट्रवादीतील धुसफूस देखील चव्हाट्यावर आली आहे. रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या 345 व्या पुण्यतिथी निमित्ताने आयोजित कार्यक्रमातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे फायलीवरून तक्रार केल्याचे समोर आल्याने राज्यात एकच खळबळ उडाली आहे. या वादावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका वाक्यातच उत्तर देत विषयच संपवाला आहे. ते साताऱ्याच्या दौऱ्यावर असताना पत्रकारांशी बोलत होते.

महायुती सरकारमध्ये सध्या पालकमंत्रिपदावरून रस्सीखेच होताना दिसत असून रायगडसह नाशिकचा तिढा सुटलेला नाही. त्यातच आता शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये फायलीवर सह्या करण्यावरून वाद असल्याचे समोर आले आहे. रायगडावर कार्यक्रमाला आलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच थेट तक्रार केल्याचे समोर आले आहे. तर शिंदे यांनी 'आमच्या अर्थ खात्याच्या फाइल्स क्लिअर होत नाहीत', अशी तक्रार केल्याचे बोलले जात आहे.

आता या तक्रारीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया असून शिंदेंनी अशी कोणती तक्रार केली नाही, असे ते म्हणाले आहेत. तसेच 'मला अमित शाह यांनी याबाबत कोणतीच विचारणा केलेली नाही. पण सूत्रांच्या माहितीनुसार सांगणं आता बंद करा, असे म्हणत त्यांनी आपली संतप्त भावना व्यक्त केली आहे.

एकनाथ शिंदे यांना काही सांगायचं असेल तर ते तिकडं तक्रार करतील असं मला वाटत नाही. ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना किंवा मला बोलतील, पीएशी बोलतील. आम्ही दर आठवड्याला सरकारच्या वेगवेगळ्या निर्णयासंदर्भात एकत्र येत असतो. चर्चा होत असते. आम्ही चर्चा करून प्रश्नांवर मार्ग काढत असतो. आमचे संबंध चांगले आहेत, असेही अजित पवार यांनी म्हटलं आहे.

नेमकं कोणती तक्रार केलीय?

रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या 345 व्या पुण्यतिथी निमित्ताने कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची प्रमुख उपस्थिती होती. त्याचबरोबर यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह इतर नेते उपस्थित होते. याच कार्यक्रमात शिंदे यांनी अमित शाह यांच्याकडे अर्थ खात्याची तक्रार केली. त्यांनी, अर्थ खात्याकडून आपल्या फाईलींवर सह्या केल्या जात नाहीत. त्या मंजूर केल्या जात नसल्याची तक्रार केली होती. ज्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT