Deputy CM Eknath Shinde Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

DCM Eknath Shinde : औरंगजेबच्या कबरीवरून उपमुख्यमंत्री शिंदेंचं मोठं विधान, काँग्रेसवरही पलटवार; म्हणाले...

Eknath Shinde On Aurangzeb Tomb : राज्यात औरंगजेबच्या कबरीवरून वाद सुरू असून त्याची कबर हटविण्याची मागणी होत आहे. याचमुद्द्यावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिल्यांदाच शासनाच्यावतीने आपली भूमिका मांडलीय.

Aslam Shanedivan

Aurangzeb Tomb Removal Controversy: राज्यात औरंगजेबच्या कबरीवरून वाद सुरू असून त्याची कबर हटविण्याची मागणी शिवभक्तांकडून होत आहे. तर या मुद्द्यावर महायुती सरकारने योग्य निर्णय न घेतल्यास कबर उखडून टाकू असा इशाराही देण्यात आला आहे.

तर राज्यात औरंगजेबची कबर काढून टाकावी की नको यावरून आता नवा वाद सुरू झाला आहे. याचमुद्द्यावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिल्यांदाच आपली भूमिका मांडलीय. शिंदे यांनी आपली भूमिका मांडताना, 'औरंग्याची निशाणी महाराष्ट्रात कशाला पाहिजे? जी शिवभक्तांची भावना आहे, तीच माझी भावना आहे', असे म्हटलं आहे.

देहू येथील श्री संत तुकाराम महाराज पुरस्काराने शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सन्मानित करण्यात आले. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना हे विधान केलं आहे. यावेळी त्यांनी, छत्रपती संभाजीनगर येथील औरंगजेबची कबर हटविण्यासंदर्भात सुरू असलेल्या मागणी आणि वादावर आपली भूमिका मांडली.

एकनाथ शिंदे यांनी, औरंग्याची निशाणी महाराष्ट्रात कशाला पाहिजे? असा सवाल करताना जी भावना शिवभक्तांची आहे, तीच माझी भावना आहे, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. तसेच आपण शिवभक्तांच्या भावनांचा आदर करत असून औरंगजेबने संभाजी महाराजांचा अनन्वित छळ केला.

संभाजी महाराजांचे शौर्य आणि औरंगजेबचे क्रौर्य आहे. त्याच्या क्रौर्याची परिसीमा गाठली होती. अशा औरंग्याची निशाणी महाराष्ट्रात कशाला पाहिजे? त्यामुळेच शिवभक्तांची भावना ही औरंगजेबची कबर काढून टाकावी, ती आपल्या महाराष्ट्रात नको अशी आहे. हीच माझीही भावना असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले.

तसेच राज्यातील जनतेला उद्देशून जो खरा देशभक्त आहे, त्याने औरंगजेबचे उदात्तीकरण करू नये, असे आवाहान केले आहे. तर क्रूरकर्मा औरंग्याचे कोणीही समर्थन करता कामा नये. औरंग्या महाराष्ट्राचा दुश्मन होता, तो देशद्रोही, आणि राष्ट्रद्रोही होता, अशा या औरंग्याच्या खाणाखुणा महाराष्ट्रात नकोच. तर जे औरंग्याचे उदात्तीकरण करतात त्यांचा निषेध केला पाहिजे, असेही त्यांनी म्हटलं आहे.

जनाची नाही तर मनाची तरी

दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महायुती आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना औरंगजेबाची उपमा दिल्यावरून देखील त्यांनी पलटवार केला आहे. काँग्रेस म्हणजे औरंगजेबी वृत्ती असून ते त्यांच्या कृत्यातून दिसते.

काँग्रेसवाल्यांनी आधी संभाजी महाराज यांचा चित्रपट बघावा आणि मग उदात्तीकरणाचा विचार करावा, असा टोलाही शिंदेंनी लगावला आहे. तसेच औरंग्याची क्रूरता बघा, मी मुख्यमंत्री होतो तेव्हा देवेंद्रजी टीममध्ये होते आता ते मुख्यमंत्री आहेत आमची टीम आहे.

आम्ही जो काही कारभार केला तो छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊनच. आम्ही सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचे काम केले. आदर्श छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांचा जो आदर्श होता, त्याच आदर्शावर आम्हीही काम करत आहोत. त्यामुळे कोणाशी तुलना तुम्ही करता? जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवा, अशी टीका देखील सपकाळ यांच्यावर उपमुख्यमंत्री शिंदेंनी केली आहे.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT