Solapur, 24 September : आमदार नारायण पाटील यांनी निर्वाणीचा इशारा देऊन करमाळा तालुक्यातील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना अखेर बाबुराव बोत्रे पाटील यांच्या ओंकार ग्रुपच्या ताब्यात गेला आहे. त्यामुळे करमाळ्याचे आमदार नारायण पाटील यांना मोठा धक्का बसला आहे.
पुणे येथील राज्य सहकारी साखर कारखान्याच्या न्यायालयात आदिनाथ सहकारी साखर कारखाना ओंकार ग्रुपच्या ताब्यात देण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. या निर्णयामुळे सोलापूर जिल्ह्यातील सहावा साखर कारखाना बोत्रे पाटील यांच्या ओंकार ग्रुपकडे गेला आहे. आदिनाथ साखर कारखाना ताब्यात घेतल्यानंतर राज्यातील एकूण २४ साखर साखर कारखाने ओंकार ग्रुपच्या ताब्यात आले आहेत.
राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाने (एनसीडीसी) थकीत कर्जामुळे विक्री निविदा आणि खरेदी प्रक्रिया राबविण्यात आली होती. ही प्रक्रिया पुण्यातील सहकार प्राधिकारणाच्या न्यायालयात पार पडली. त्यात श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना ओंकार ग्रुपच्या ताब्यात देण्याचा निर्णय पुणे न्यायालयाने दिला. त्यामुळे कारखान्यासाठी कर्ज मिळविण्याच्या प्रयत्नात असलेल्या नारायण पाटील यांना धक्का बसला आहे.
करमाळा तालुक्यातील शेलगाव-भाळवणी येथे श्री आदिनाथ सहकारी कारखाना आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडला होता. त्यामुळे कारखान्याने दिल्ली येथील एनसीडीसी आणि राज्य सहकारी बँकेकडून कर्ज घेतले होते. कारखान्याकडून कर्जाची वेळेत परतफेड न झाल्याने मालमत्ता जप्त करून कारखान्याच्या मालमत्तेची लिलाव प्रक्रिया राबवण्यात आली.
या लिलाव प्रक्रियेत ओंकार ग्रुपने हा कारखाना ताब्यात घेतला आहे. त्यामुळे या ग्रुपच्या ताब्यात राज्यातील तब्बल २४ कारखाने आले आहेत. त्यात सोलापूर जिल्ह्यातील सहावा कारखाना आहे, त्यामुळे राज्यात ओंकार ग्रुपचे साखर कारखान्यातील साम्राज्य दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.
दरम्यान, श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्यावर विद्यमान आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळाची सत्ता आहे. आमदार पाटील हे कारखान्याचे अध्यक्ष आहेत. लिलाव प्रक्रियेतून आदिनाथ साखर कारखाना ताब्यात कोणी ताब्यात घेऊ नये, आम्ही तो सहकारीच राहील, यासाठी प्रयत्न करत आहोत. वेळ पडली तर आम्ही न्यायालयात जाऊ. प्रसंगी रक्त सांडू. मात्र सभासद-कामगारांच्या घामाचा पैसा आम्ही कोणाच्याही घशात जाऊ देणार नाही. आपल्या राजकीय शक्तीचा वापर करून सुमारे ४५० कोटींचा कारखाना अवघ्या १२० कोटींत विकत घेण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर आम्ही तो चालू देणार नाही, असा निर्वाणाचा इशारा नारायण पाटील यांनी दिला होता.
करमाळ्यातील शेतकऱ्यांना न्याय देऊ : बाबूराव बोत्रे पाटील
दरम्यान, ओंकार ग्रुपने अडचणीत असलेले राज्यातील अनेक साखर कारखाने ताब्यात घेऊन यशस्वीरित्या चालवून शेतकऱ्यांच्या ऊसाला चांगला बाजारभाव देत बाजारपेठ उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे आदिनाथ साखर कारखान्याच्या माध्यमातून करमाळा तालुक्यातील शेतकरी, व्यापारी, कामगारांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे ओंकार ग्रुपचे प्रमुख बाबूराव बोत्रे पाटील यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.