Graduate-Teacher constituency : ‘पदवीधर-शिक्षक’साठी मतदारनोंदणी करायची राहिलीय..? घाबरू नका, शनिवारपर्यंत नोंदणीची संधी

Voter Registration Opportunity : विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी मतदार नोंदणीची संधी अद्याप उपलब्ध आहे. पात्र शिक्षक आणि पदवीधरांना शनिवार २६ सप्टेंबरपर्यंत नवीन मतदार म्हणून नोंदणी करता येणार आहे.
 Graduate-Teacher constituency Election
Graduate-Teacher constituency ElectionSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 24 September : तुम्ही शिक्षक किंवा पदवीधर आहात? परंतु विधान परिषद निवडणुकीसाठी मतदार नोंदणी करायची राहून गेली असेल, तर तुम्हाला आणखी तीन दिवस मतदार नोंदणीची संधी आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम तारखेच्या १० दिवस अगोदरपर्यंत नवीन मतदार नोंदणी करता येते. विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी येत्या शनिवारपर्यंत (ता. २६ सप्टेंबर) मतदार नोंदणी करता येणार आहे.

सुटीच्या दिवशी मतदार नोंदणीचे अर्ज स्वीकारण्यासाठी शुक्रवारी (ता. २५ सप्टेंबर) व शनिवारी (ता. २६ सप्टेंबर) तहसील कार्यालयातील निवडणूक शाखा सुरू ठेवण्यात येणार आहे. त्यानंतरच मतदारांची अंतिम आकडेवारी समोर येणार आहे. पाच जिल्ह्यांचा समावेश असलेल्या या मतदारसंघात सध्या ३ लाख ७ हजार ८२३ पदवीधर, तर ५१ हजार ७५० शिक्षक मतदार आहेत.

सोलापूर जिल्ह्यात ३७ हजार ९५७ पदवीधर, तर १३ हजार १३६ शिक्षक मतदार आहेत. या मतदारांची संख्या गृहीत धरून पदवीधर मतदारसंघासाठी जिल्ह्यात १०९, तर शिक्षक मतदारसंघासाठी ७१ मतदान केंद्रे असणार आहेत. शनिवारपर्यंत (ता. २६) होणाऱ्या मतदार नोंदणीच्या आकडेवारीनंतर मतदान केंद्रांच्या संख्येत आणखी वाढण्याची शक्यता आहे.

कोणत्या विधानसभा मतदारसंघात किती मतदार

करमाळा : पदवीधर : ३८३८, शिक्षक : १२७५

माढा : पदवीधर : ४३६४, शिक्षक : १३३०

बार्शी : पदवीधर : ३०२२, शिक्षक : १४३१

मोहोळ : पदवीधर : ४२५३, शिक्षक : ९५३

सोलापूर शहर उत्तर : पदवीधर : १३७०, शिक्षक : ५७१

सोलापूर शहर मध्य : पदवीधर : १०५९, शिक्षक : ४३१

अक्कलकोट : पदवीधर : १९८१, शिक्षक : ९९०

सोलापूर दक्षिण : पदवीधर : ४३७७, शिक्षक : १४१६

पंढरपूर : पदवीधर : ४७१४, शिक्षक : १८१०

सांगोला : पदवीधर : ४२३९, शिक्षक : १७६३

माळशिरस : पदवीधर : ४७४०, शिक्षक : ११६६

एकूण : पदवीधर : ३७९५७, शिक्षक : १३१३६

 Graduate-Teacher constituency Election
Pune DCC Bank Election : आमदाराची पत्नी विरुद्ध माजी आमदार? पुणे जिल्हा बँकेच्या आखाड्यात पुन्हा ‘कुल-थोरात’ आमनेसामने

पदवीधरसाठी लागणारी कागदपत्रे

पदवी प्रमाणपत्राची प्रत किंवा पदवीची मार्कशीट/प्रमाणपत्राची सत्यापित प्रत

काही प्रकरणात शासकीय सेवेत असल्यास कार्यालयीन नोंदीतील शैक्षणिक पात्रतेचा प्रमाणित दाखला

(निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार पदवीची पात्रता निर्धारित पात्रता तारखेच्या किमान तीन वर्षे आधीची असणे आवश्यक आहे. पदवी उत्तीर्ण झाल्याची तारीख ही दीक्षान्त समारंभाची तारीख नसून विद्यापीठाने निकाल जाहीर केल्याची तारीख ग्राह्य धरली जाते.)

 Graduate-Teacher constituency Election
MLC Election : मंत्री हसन मुश्रीफांनी वाढवले भाजपचे टेन्शन, पदवीधरसाठी राष्ट्रवादीकडून भैय्यासाहेब माने उमेदवार?

शिक्षक मतदारासाठी लागणारी कागदपत्रे

संबंधित शैक्षणिक संस्थेच्या मुख्याध्यापक/प्राचार्यांचे प्रमाणपत्र

गेल्या सहा वर्षांत एकूण किमान तीन वर्षे अध्यापन केल्याचा पुरावा

संस्थेचे नाव, अध्यापनाचा कालावधी आणि पद याची माहिती

आवश्यक असल्यास संस्थेच्या नोंदी/सेवा नोंदीतील प्रमाणित पुरावा

(शिक्षक मतदारसंघासाठी फॉर्म १९ शक्यतो संबंधित संस्थेच्या प्रमुखामार्फत पडताळणी करून घेणे आवश्यक असते.)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com