Devabhau Jan-Arogya Abhiyan Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur ZP : सोलापूर जिल्ह्यात ‘देवाभाऊ जनआरोग्य अभियान’ राबवणार : सर्वसामान्यांच्या आरोग्य सेवेसाठी ZP सभापतींची घोषणा

Devabhau Jan-Arogya Abhiyan : सोलापूर जिल्हा परिषदेने ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी ‘देवाभाऊ जनआरोग्य अभियान’ सुरू केले. नाझरा प्राथमिक आरोग्य केंद्रातून अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.

दत्तात्रय खंडागळे

Sangola, 05 July : ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आणि प्रभावी आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सोलापूर जिल्हा परिषदेने ‘देवाभाऊ जनआरोग्य अभियान’ या नव्या उपक्रमाची सुरुवात केली आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य व शिक्षण समितीचे सभापती चेतनसिंह केदार सावंत यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. सांगोला तालुक्यातील नाझरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातून या अभियानाचा आज (रविवारी, ता. 05 जुलै) शुभारंभ करण्यात आला.

राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे आणि माढ्याचे माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येणार आहे, असेही केदार सावंत यांनी स्पष्ट केले.

या अभियानांतर्गत सभापती सावंत प्रत्येक रविवारी जिल्ह्यातील एका प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन तेथील आरोग्य सेवा, शासकीय योजनांची अंमलबजावणी, उपलब्ध सुविधा तसेच नागरिकांना मिळणाऱ्या सेवांचा प्रत्यक्ष आढावा घेणार आहेत. आढाव्यात आढळणाऱ्या त्रुटींची नोंद करून संबंधित अधिकाऱ्यांच्या समन्वयातून त्यावर तातडीने कार्यवाही केली जाणार आहे.

दरम्यान, सांगोला तालुक्यातील नाझरा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भेटीतून या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे. नाझरा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भेटीदरम्यान माता-बाल आरोग्य, जननी सुरक्षा योजना, प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान, सार्वत्रिक लसीकरण, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम, किशोर आरोग्य, कुटुंब नियोजन, ॲनिमियामुक्त भारत अभियान, राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम, मलेरिया, डेंग्यू व फायलरिया नियंत्रण, असंसर्गजन्य रोग तपासणी, मानसिक आरोग्य सेवा, आयुष्मान भारत, महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना, रोग सर्वेक्षण (आयडीएसपी), मोफत औषध वितरण, प्रयोगशाळा सेवा तसेच १०२ व १०८ रुग्णवाहिका सेवांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

या अभियानामुळे सोलापूर जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या कार्यपद्धतीत गुणवत्ता, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व अधिक बळकट होऊन सर्वसामान्यांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळण्यास मदत होईल, असा विश्वास केदार सावंत यांनी यावेळी व्यक्त करण्यात आला.

यावेळी सांगोला पंचायत समितीचे उपसभापती अजय सरगर, पंचायत समिती सदस्य सदाशिव दबडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप देवकते, विस्तार अधिकारी जयंत टकले तसेच वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT