Devendra Fadnavis offer : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची उदय सामंतांना थेट सहकार मंत्रिपदाची ऑफर; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Cooperative Minister post : आंतरराष्ट्रीय सहकार दिन कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांना सहकार मंत्रिपदाची मिश्कील ऑफर दिल्याने राजकीय चर्चांना पुन्हा उधाण आले.
Devendra Fadnavis-Uday Samant
Devendra Fadnavis-Uday SamantSarkarnama
Published on
Updated on

Mumbai, 05 July : आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सहकार गौरव पुरस्कार कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्योगमंत्री तथा शिवसेना नेते उदय सामंत यांना थेट सहकार मंत्रिपदाची ऑफर दिली. फडणवीसांनी दिलेल्या ऑफरमुळे उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. मात्र, राजकीय वर्तुळात उदय सामंत यांच्याबाबत पुन्हा चर्चा रंगली आहे.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमधील कार्यक्रमात बोलताना उद्योग मंत्री सामंत म्हणाले, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची निवडणूक काही दिवसांनी होणार आहे, त्यामुळे मलाही आता सहकार क्षेत्रात यावे असे वाटत आहे. प्रवीण दरेकरसाहेब, मला आशीर्वाद द्या.

सहकारात राजकारण नसावे, असे भाषणांमधून सर्रासपणे सांगितले जाते. पण सहकारात प्रत्यक्षात राजकारण असते की नाही, हे मला ठाऊक नाही. कारण कोकणात सहकार क्षेत्र एवढे वाढलेले नाही, असेही उदय सामंत यांनी नमूद केले.

उदय सामंत यांच्या भाषणाचा धागा पकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट त्यांना सहकार मंत्रिपदाची ऑफर देऊन टाकली. राज्यातील पहिली ग्रामीण पतपेढी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथे सुरू झाली आहे, त्यामुळे सहकाराची सुरुवात कोकणातूनच झाली आहे, त्यामुळे त्या ठिकाणी चांगली संधी आहे, तुम्ही काहीही काळजी करू नका, असे सांगितले.

Devendra Fadnavis-Uday Samant
Manohar Bhosale : मनोहरमामाचा 35 वर्षीय महिलेवर किडनीचा आजार बरा करण्याच्या बहाण्याने बलात्कार

तुम्हा उद्योग मंत्री म्हणून चांगले काम करतच आहात. पण तुमची इच्छा बघता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलून तुम्हाला सहकार विभाग द्यावा, असा विचार माझ्या डोक्यात सध्या आला आहे, अशी गुगली देवेंद्र फडणवीस यांनी टाकली. त्यांच्या गुगलीने सभागृहात एकच हशा पिकला.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्या कार्यक्रमात बोलताना केलेली एक कोटी होती. मात्र, फडणवीस यांच्या ऑफरमुळे उदय सामंत यांच्याबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

Devendra Fadnavis-Uday Samant
Union Cabinet Expansion : ओम राजेनिंबाळकर,संजय जाधवांचे मंत्रिपद हुकणार? ऐनवेळी 'या' नेत्याचे नाव आघाडीवर; एकनाथ शिंदेंचा वेगळाच प्लॅन

राष्ट्रवादीकडून आणखी एक महत्वाचे खाते जाणार?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर अर्थसंकल्प तोंडावर आल्यामुळे अर्थमंत्रिपद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. मात्र, ते पुन्हा राष्ट्रवादीला देताना फडणवीस हे दिल्लीत वरिष्ठांकडे बोट दाखवत आहेत. आता सहकार विभागाबाबत फडणवीस यांनी भाष्य केल्याने तेही मंत्रिमंडळ फेरबदलात भाजप काढून घेणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण फडणवीसांचे निष्ठावंत प्रवीण दरेकर यांना मंत्रिमंंडळात घेण्यासाठी ते इच्छूक आहेत. आगामी फेरबदलात दरेकरांना मंत्रिमंडळात घेऊन त्यांच्याकडे सहकार विभाग देण्याची तयारी असल्याची चर्चा सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis
Uddhav Thackeray, Eknath Shinde, Devendra Fadnavis
Eknath Shinde, Devendra Fadnavis, Aaditya Thackeray’
Devendra Fadnavis
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com