Devendra Fadnavis Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Devendra Fadnavis: CM फडणवीसांकडून सोलापूरकरांसाठी एकाचवेळी दोन मोठ्या घोषणा; 'स्थानिक'ची निवडणूक फिरवणार

Solapur News: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी (ता.15) सोलापूर-मुंबई विमानसेवेचं उद्घाटन करण्यात आलं. याच कार्यक्रमात फडणवीसांनी सोलापूरसाठी आणखी दोन अत्यंत महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत.

Deepak Kulkarni

Solapur News: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी(ता.15) सोलापूर-मुंबई विमानसेवेचं उद्घाटन करण्यात आलं.याच कार्यक्रमात फडणवीसांनी सोलापूरसाठी आणखी दोन अत्यंत महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. त्यातली एक म्हणजे सोलापूरला लवकरच एक चांगला आयटी पार्क तयार करणार आहोत. दुसरी सोलापूरकरांना 24x7 पाणी देणार,या दोन मोठ्या घोषणा केल्या आहेत.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, अलिकडच्या काळात एखा,एखाद्या शहराचा,जिल्ह्याचा विकास करायचा असेल, तिथे रोजगार आणि उद्योग आणायचे असतील,तर हवाई सेवा असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आज उद्योजक पाहतात,कुठला जिल्हा हवाई सेवेनं जोडला आहे. कुठे विमान उतरवता येतंय,कुठे फंक्शनल विमानतळ आहे. त्याआधारावर उद्योजक मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीबाबतचा निर्णय करतात,असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले.

फडणवीस म्हणाले, आज आपण पाहतोय,मोठ्या प्रमाणात निर्यात सुरू झाली आहे,वेगवेगळ्या प्रकारे जगाच्या मार्केटशी आपण जोडले जात आहे.अशापरिस्थितीत जर आपल्याला विकासाकडे जायचं असेल,तर फंक्शनल एअरपोर्ट असणं आणि एअर कनेक्टिव्हीटी असणं अत्यंत आवश्यक आहे. हे अत्यंत महत्त्वाचं असतं. या सोलापूरमध्ये तर अनेक वर्षांपासून एअरपोर्ट होतं,पण ते चालत नव्हतं अशी टीका त्यांनी केली.

खूप वर्षांपूर्वी विमानसेवा सुरू झाली,ती सात दिवसांत बंद झाली.2009 साली पुन्हा विमानसेवा सुरू झाली अन् ती पुन्हा बंद झाली.अशा पध्दतीनं इथं हवाईसेवा सुरू होऊ शकत नव्हती.पण 2014 नंतर आम्ही सुरू केला. कारण सोलापूरसारखं (Solapur) महत्त्वाचं शहर ज्याच्या आसपास कुठेही फंक्शनल एअरपोर्ट नाही, जो जिल्हा पर्यटनाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण पंढरपूरला पांडुरंग आहे, तुळजाभवानी आहे,सिध्देश्वर आहे, यांसारखी सगळी शक्तिपीठं एकत्र आहे, अशाठिकाणी एअर कनेक्टिव्हीटी नसल्यामुळे देशभरातली भाविकं येत नाही,किंवा त्यांचा येण्याचा ओघ कमी होतो, यामुळे हा एअरपोर्ट सुरू करण्यासाठी आम्ही प्रयत्न केला, असंही फडणवीस म्हणाले.

ज्यावेळी याबाबत एअरपोर्ट ऑथोरिटींशी आम्ही चर्चा केली.त्यांनी आम्ही हे विमानतळ सुरु करायला किंवा त्याचं नूतनीकरण करायलाही तयार असल्याचं सांगितलं.पण जोपर्यंत कारखान्याची चिमणी हटवली जात नाही, तोपर्यंत आम्हांला विमानतळ सुरू करता येणार नाही,असं त्यांनी सांगितलं. मग त्यानंतर एक लंबी लढाई झाली. कोर्टामध्ये अशी सगळीकडे ती झाली.

खरं म्हणजे आम्हीपण हे समजावून सांगितलं की, ही चिमणी हटवणं ही काय आमची प्राथमिकता नाही. साखर कारखानाही आमच्यासाठी महत्त्वाचा आहे.पण जर एक चिमणी हटवल्यामुळे एअरपोर्ट सुरू होणार असेल, तर ते केलं पाहिजे. एक हटवलेली चिमणी दुसर्‍या ठिकाणी बांधता येऊ शकते. पण जर एक एअरपोर्ट जर सुरू झालं तर सोलापूरचा किती विकास होईल.याची आपल्याला कल्पना आहे.

याच कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सोलापूरसाठी दोन अत्यंत महत्त्वाच्या घोषणा केल्या. त्यातली एक म्हणजे जागा वगैरे निश्चित होतेय, पण सोलापूरला लवकरच एक चांगला आयटी पार्क तयार करणार आहोत. सोलापूरची जी मुले पुण्यात बसली आहे,त्यांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करुन देणार आहोत.

आपण मध्यंतरी समांतर योजना आणली.त्यातही अनेक अडथळे आले.पण आपण ती योजना पूर्ण केली. यानंतर ही सर्वमंडळी पुन्हा माझ्याकडे आली,अन् मला म्हणाले,जर सोलापूरकरांना आपल्याला 24x7 पाणी द्यायचं असेल,तर एक नव्यानं योजना आणावी लागेल.त्यासाठी 1 हजार कोटी रुपये आम्हांला द्या. काळजी करू नका, ते ही 1000 कोटी रुपये देण्याचा निर्णय आपण घेतला आहे. त्यामुळे येत्या काळात सोलापूरमधील प्रत्येक घरात 24x7 पाणीपुरवठा सुरू होईल, अशी घोषणा मुख्यमंत्री फडणवीसांनी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT