Devendra Fadnavis Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Devendra Fadnavis: शिवाजी पाटलांसाठी फडणवीस हा कोरा चेक! शक्तिपीठ महामार्ग चंदगडातून येणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा

Devendra Fadnavis Announces Shaktipeeth Highway From Chandgad | चंदगड हा सीमाभाग असला तरी महाराष्ट्राचे प्रवेशद्वार आहे. मोदी पंतप्रधान झाल्यानंतर गावांचा विकासाबरोबर शहरांचा विकास झाला पाहिजे, शहरांचे जीवनमान उंचावले पाहिजे हा मोदींचा विचार होता.

Rahul Gadkar

Kolhapur News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील हे दोघेही एकमेकांच्या निकटवर्तीय आहेत. अशातच 2019 च्या निवडणुकीत अपक्ष लढून पराभव आणि 2024 च्या निवडणुकीत अपक्ष लढून विजय मिळवला. आत्तापर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंदगडमध्ये तीन वेळा जंगी कार्यक्रम घेतले आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ आमदार शिवाजीराव पाटील यांनी मोर्चा काढला होता.

पाटील आणि फडणवीस यांचे नाते आणखी घट्ट आहे. भाजपकडून चंदगड नगरपंचायत निवडणूक लढवली जात आहे. याच्या प्रचाराला खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चंदगडमध्ये दाखल झाले. दर शिवाजीराव पाटील यांच्याबाबत असलेला स्नेह त्यांनी आपल्या भाषणातून बोलून दाखवला. इतकेच नव्हे तर मंत्री फडणवीस यांनी चंदगड मधून शक्तिपीठ महामार्ग नेणार असल्याची घोषणा केली.

फडणवीस म्हणाले, "चंदगड हा सीमाभाग असला तरी महाराष्ट्राचे प्रवेशद्वार आहे. साठ पासष्ट वर्षे आपण गावाचा विकास करीत होतो.पण त्याचा विसर मागील सरकारला पडला होता. साठ वर्षात शहरांच्या विकासाकडे लक्ष दिले नाही. पंतप्रधान मोदी झाल्यानंतर गावांचा विकासाबरोबर शहरांचा विकास झाला पाहिजे, शहरांचे जीवनमान उंचावले पाहिजे हा मोदींचा विचार होता.

पण आताची परिस्थिती पाहिली तर खूप कमी लोकांना रस्त्यांचे महत्व कळते. जिथ रस्ता वाढतो तिथे विकास होतो. आमदार शिवाजी पाटील यांनी शक्तिपीठ समर्थनार्थ मोर्चा काढला. आम्ही आता चंदगडमधून शक्तिपीठ महामार्ग नेणारं आहोत. आता गोव्यात काही मिनिटांत पोहचणार, रस्ता झाला की औद्योगिक उद्योग येतील. आजरा, चंदगड गडहिंग्लज, या शहरांचा विकास झपाट्याने होईल. ज्या दिवशी चंदागडाला शक्तिपीठ महामार्ग बनेल त्यावेळी कोणी थांबवू शकणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आहे.

"शिवाजी पाटील यांच्यासाठी हा देवेंद्र फडणवीस हा कोरा चेक आहे. आमदार नसताना 104 कोटीची काम दिली, आता चंदगडाचा मी दोघे मिळून विकास जोरात करू,चंदगडला अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय लवकरच आणतो," अशी घोषणा देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT