Kolhapur News : जालना येथील मराठा समाज बांधवांवर पोलिसांकडून झालेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ आज कोल्हापुर बंदची हाक देण्यात आली आहे. त्याला कोल्हापूरकरांकडून प्रचंड प्रतिसाद देत जालना येथील घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला गेला. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. (Latest Marathi News)
सकल मराठा समाज बांधावाकडून कोल्हापुरातील दसरा चौकात निषेध आंदोलन केले गेले. यावेळी 'एक मराठा लाख मराठा, फडणवीस राजीनामा द्या -राजीनामा द्या', अशा घोषणा देत परिसर आंदोलकांनी दणाणून सोडले. दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.
प्रजासत्ताक संस्थेचे दिलीप देसाई म्हणाले, "राज्य सरकार प्रत्येकवेळी मराठा समाजाला फसवत आलेले आहे. जालनासारखा प्रकार हा सरकारने समाजावर केलेला अत्याचार आहे. संसदेच्या विशेष अधिवेशनात मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय मार्गी लावावा अन्यथा आज कोल्हापूर बंद केले आहे, उद्या महाराष्ट्र बंद करायला भाग पाडू नका," असा इशारा त्यांनी दिला.
जालना घटनेचा निषेध करण्यासाठी कोल्हापूर बंदची हाक देण्यात आली. त्यांचा निषेध करण्यासाठी आज सकल मराठा समाजाचे पदाधिकारी दसरा चौकात दाखल झाले. त्यावेळी ठाकरे गटाचे पदाधिकारी डोक्याला काळ्या पट्ट्या बांधून निषेध केला. लाठीचार्जचे आदेश देणारे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली गेली.
महाराष्ट्रात एक फुल-दोन हाफ तिकिटाचे सरकार सुरु आहे. हे सरकारने मराठा समाजाकडे दुर्लक्ष केले. तुमचा माफीनामा आम्हाला नको, आम्हाला आरक्षण द्या, अशी मागणी उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे जिल्हाध्यक्ष विजय देवणे यांनी केली.
15 ऑगस्ट रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत सकल मराठा समाजाच्या पदाधिकारींसोबत बैठक झाली. या बैठकीवेळी ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अशी मागणी करण्यात आली.
कोल्हापुरचे जिल्हाधिकारी राहूल देखावर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण दिले तर दंगली पेटतील, असे वक्तव्य केले. मात्र एक प्रशासन अधिकारी असताना अशा पद्धतीचे वक्तव्य तुम्हाला शोभते का? असा जाब सकल मराठा समाजाच्या वतीने विचारण्यात आला. जिल्हाधिकारी रेखावर यांना बदलण्याची आता मागणी आंदोलकांकडून होत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.