Beed News : बीडच्या भुमिपुत्राकडूनच मराठा आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर ; जरांगे यांच्यामुळे अंतरवालीची देशात ओळख

Manoj Jarange News : मागच्या पाच वर्षांपासून मागे पडलेला मुद्दा पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांच्यामुळे ऐरणीवर आला.
Manoj Jarange News
Manoj Jarange NewsSarkarnama
Published on
Updated on

Maratha Reservation : मराठा आरक्षणाची अनेक वर्षांपूर्वीची मागणी आहे. या मागणीसाठी जगाला हेवा वाटावा असे शांततेतील मुक मोर्चे आणि ठोक मोर्चात समाजातील ४१ लोकांचे बळी गेले तरी समाजाच्या हाती काहीच पडले नाही. मागच्या पाच वर्षांपासून मागे पडलेला मुद्दा पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांच्यामुळे ऐरणीवर आला. विशेष, म्हणजे त्यांच्या आंदोलनामुळे जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटे (ता. अंबड) देशाच्या नकाशावर ठळक आणि सध्या सर्व सत्तेचे लक्ष असलेले ठिकाण झाले आहे.

आंदोलनाने सरकार देखील हादरले आहे. ही किमया करणारे जरांगे बीड (Beed) जिल्ह्यातील भूमिपुत्र आहेत. त्यांचे गाव मातोरी (ता. शिरुर कासार) आहे. सासुरवाडीला स्थाईक झाल्यानंतर शिवबा संघटनेची स्थापना करुन ते मराठा आरक्षण चळवळीत सक्रीय झाले. त्यांच्या घरची परिस्थिती बेताची असल्याने त्यांनी कधीकाळी हॉटेलमध्येही काम केले आहे. सामाजिक कार्याची त्यांना आवड आहे. बारावी उत्तीणी जरांगे यांच्या कुटुंबात पत्नी, चार मुले, तीन भाऊ व आई-वडील आहेत.

Manoj Jarange News
Pankaja Munde At Grishneshwar : घृष्णेश्वराचे दर्शन घेत पंकजा यांच्या `शिवशक्ती` परिक्रमेला सुरूवात..

मातोरी येथे शेत जमीन कमी असल्यामुळे जरांगे त्यांची सासरवाडी असलेल्या समर्थ कराखना येथे वास्तव्यास गेले. तेथे त्यांना चार एक्कर जमीन होती. मात्र, मराठा आरक्षणाचा ध्यास मनात असल्याने त्यांनी चळवळ उभी करत मराठा आरक्षणासाठी दोन एक्कर जमीन विकून टाकली. त्यांनी कधीकाळी जालन्यात काँग्रेसमध्येही काम केले. शिवबा संघटनेच्या माध्यमातून महानाट्याच्या निमित्ताने ते प्रकाश झोतात आले. 2014 ला शाहगड ते मुंबई पायी फेरी व छत्रपती संभाजीनगर येथील त्यांच्या नेतृत्वाखालील मोर्चाही गाजला होता.

हळूहळू शिवबा संघटना आक्रमक होत गेली. कोपर्डी (जि. अहमदनगर) येथील अत्याचार प्रकरणातील आरोपींना फाशी द्या या प्रमुख मागणीसाठी त्यांनी आंदोलन केले होते. यावेळी या प्रकरणातील आरोपीना न्यायालया बाहेर मारहाण ही जरांगे यांच्या समर्थकांनी केली होती. या मारहाण प्रकरणी बाबुराव वालेकर, राजेंद्र जर्हाड, अमोल कोल्हे, गणेश कोल्हे या चार युवकांना दोन वर्षांची शिक्षा झाली होती. त्यांनी 2021 मध्ये अंबड तालुक्यातील साष्टपिंपळगाव येथे तब्बल तीन महिन्यांचे ठिय्या आंदोलनही केले होते.

Manoj Jarange News
Maratha Reservation : बीड जिल्ह्यात आंदोलनाची धग कायम ; डोंगरकिन्हीत अन्नत्यागाचा तिसरा दिवस

अंबड तालुक्यातील पैठण फाटा येथे पुन्हा त्यांनी मराठा आरक्षण मिळावे म्हणून जन आक्रोश मोर्चा काढला होता. त्यामध्ये सरकारकडून कोणतीच दखल घेतली जात नसल्याने त्यांनी अंबड तालुक्यातील आंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी बेमुदत अमरण उपोषणाची हाक दिली. आता राज्य सरकारचा हा सर्वात प्रमुख मुद्दा झाला असून सरकारही हादरले आहे. माध्यमांची आणि सर्वच राजकीय पक्षांच्या बड्या नेत्यांची नजर आता अंतरवलीवरच आहे. मात्र, अंतरवाली नकाशावर आणणारे जरांगे जिल्ह्याचे भूमिपुत्र आहेत.

Edited by : Amol Jaybhaye

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com