Sushma Andhare | Devendra Fadanvis Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sushma Andhare On Ajit Pawar: अजितदादांच्या स्क्रिप्टचे रायटर फडणवीस; सुषमा अंधारेंचा गौप्यस्फोट...

Sushma Andhare Criticized BJP : अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चांनी मंगळवारी (१८ एप्रिल) संपूर्ण दिवसभर राजकीय वातावरण ढवळून निघाले होते.

सरकारनामा ब्युरो

Sushma Andhare Criticized BJP: 'अजितदादांची स्क्रिप्ट भाजपने लिहिली, फडणवीस त्याचे रायटर होते', अशा शब्दांच ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. कोल्हापूरमध्ये बोलताना त्यांनी राज्य सरकारवर थेट निशाणा साधला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चांनी मंगळवारी (१८ एप्रिल) संपूर्ण दिवसभर राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. अजित पवार ४० आमदारांसह भाजपमध्ये सामील होणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या. पण दुपारच्या दरम्यान खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी या चर्चा केवळ अफवा आहेत. अजित पवार भाजपसोबत जाणार नसल्याचं जाहिर केलं. त्यांच्या पाठोपाठ अजित पवार यांनीदेखील पत्रकार परिषद घेऊन आपण जीवात जीव असेपर्यंत राष्ट्रवादीतच राहणार असल्याचं सांगत या चर्चांना पूर्णविराम दिला.

मंगळवारी घडलेल्या या सर्व घडामोडींवर सुषमा अंधारे यांनी भाजपवर टिका केली आहे. 'अजितदादांची स्क्रिप्ट भाजपने लिहिली, फडणवीस त्याचे रायटर होते', पण 'अजित पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. अजितदादांची स्क्रिप्ट भाजपकडून लिहीली गेली. देवेंद्र फडणवीस हे स्क्रिप्ट रायटर आहेत. फडणवीस यांचे मौन सगळे सांगून जाते.', अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली. (Maharashtra Politics)

इतकेच नव्हे तर, 'यामुळे शिंदे गटाचे लोक उघडे पडले आहेत. कालच्या घडामोडीवरचे त्यांचे स्टेटमेंट पाहिले तर शिंदे गटाचे लोक तंबाखूचा बार भरून बोलतात, असचं दिसत आहे, असा हल्लाबोलच सुषमा अंधारे यांनी केला. पण महाविकास आघाडी अभेद्य आहे. आम्ही एकत्र निवडणुका लढवणार आहोत, असा विश्वासही सुषमा अंधारे यांनी व्यक्त केला.

याचवेळी सुषमा अंधारेंनी महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यादरम्यान झालेल्या दुर्घटनेच्या मुद्द्यावरुनही राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. 'अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी साधेपणाने कार्यक्रम करण्याच्या सूचना दिल्या असतील. पण त्यांनी दिलेली वेळ घेतल्याचं सांगत भाजप त्यांच्याबद्दल चुकीची माहिती देत आहे. राज्य सरकारने या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या मृतांचा आकडा लपवला आहे. असा आरोप करत सोहळ्यासाठी 16 कोटी खर्च केले तर अजून थोडे पैसे खर्च करून मंडप का उभारले नाहीत?.' असा सवालही सुषमा अंधारेनी राज्य सरकारला केला आहे.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT