माजी आमदार राम सातपुते यांनी माळशिरसच्या नातेपुते येथील मेळाव्यात मोठा गौप्यस्फोट करत रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर निशाणा साधला, त्यांनी पूर्वी भाजपचे काम करण्यास नकार दिला होता, पण आता त्याच पक्षाच्या दारात येत आहेत.
सातपुते यांनी आरोप केला की मोहिते पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांच्याशी विश्वासघात केला, आणि स्थानिक राजकारणात वावड्या पसरवल्या जात असल्याचेही सांगितले.
माळशिरस तालुक्यात भाजप प्रवेशासाठी अनेक कार्यकर्ते उत्सुक असून, सातपुते यांनी अकलूजचा नगराध्यक्ष भाजपचा होईल, असा आत्मविश्वास व्यक्त केला.
Solapur, 26 October : विधानसभा निवडणुकीत माळशिरसमध्ये मतदानाची 20 नोव्हेंबर ही तारीख होती. अठरा (नोव्हेंबर) तारखेला तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (जे पुढे चार दिवसांनी मुख्यमंत्री होणार होते) यांनी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांना फोन केला आणि सांगितले की, ‘तुम्ही भाजपचे काम करा.’ त्यावेळी रणजितसिंहांनी, ‘मला माफ करा. घरच्यांच्या पुढे मला जाता येत नाही,’ असे सांगितले होते. आता तेच भाजपच्या दारात येत आहेत. हे कसं चालेल, असा गौप्यस्फोट माजी आमदार राम सातपुते यांनी केला.
माजी आमदार राम सातपुते यांच्या पुढाकारातून माळशिरस तालुक्यातील नातेपुते येथे दिपाळी स्नेह मिलन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्या मेळाव्यात बोलताना सातपुते यांनी अनेक गौप्यस्फोट केले. मेळाव्याला प्रमुख म्हणून पालकमंत्री जयकुमार गोरे उपस्थित होते. या वेळी अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
वळचणीला पडलेल्या प्रस्थापितांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम देवेंद्र फडणवीस यांनी केले. त्यांना आमदारकीही दिली. पण, त्यांनी लोकसभा निवडणुकीत देवाभाऊंच्या पाठीत खंजीर खुपसला, असा आरोपही सातपुते यांनी नाव न घेता रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर केला.
ते म्हणाले, माळशिरस तालुक्यातील अनेकजण भाजप प्रवेशासाठी रांगेत आहेत. मात्र, हे पक्षप्रवेश होऊ नयेत; म्हणून इथल्या प्रस्थापितांनी आम्ही भाजपमध्ये जाणार, आम्हाला भाजपत घेणार आहेत. आमचं वर ठरलंय. आम्हाला इतके एबी फार्म मिळणार आहेत. रामभाऊला इतके देणार आहेत. अशा वावड्या उठायला सुरुवात झाली आहे.
माळशिरस तालुक्यातील स्वाभिमानी कार्यकर्ता प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात लढतोय. एक लाख आठ हजार मतं आपण घेतोय. दोन ताकदी (मोहिते पाटील-जानकर) एकत्र येऊनसुद्धा आपण विधानसभेला मोठ्या प्रमाणात मतदान घेतले आहे. जयाभाऊ तुम्ही आम्हाला वेळ द्या. अकलूजचा नगराध्यक्ष हा भाजपचा होईल, यात काडीमात्र शंका नाही, असा विश्वासही राम सातपुते यांनी बोलून दाखवला.
Q1. राम सातपुते यांनी कोणावर आरोप केला?
त्यांनी माजी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर अप्रत्यक्ष आरोप केला.
Q2. त्यांनी कोणता गौप्यस्फोट केला?
२०१९ मध्ये मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये जाण्यास नकार दिला होता, पण आता ते त्याच पक्षात येत असल्याचे त्यांनी उघड केले.
Q3. मेळावा कुठे आयोजित करण्यात आला होता?
माळशिरस तालुक्यातील नातेपुते येथे दीपावली स्नेह मिलन मेळावा झाला.
Q4. राम सातपुते यांनी कोणता दावा केला?
अकलूजचा नगराध्यक्ष भाजपचा होईल, असा त्यांनी ठाम विश्वास व्यक्त केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.