Madha Loksabha : रणजितसिंह निंबाळकरांनी सांगितले लोकसभेतील पराभवाचे कारण; ‘चारशेपारचा नारा आला अन्‌ दुर्दैवाने मला घरी बसावं लागलं’

Ranjitsinh Naik Nimbalkar News : माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी फलटणमधील कार्यक्रमात लोकसभा पराभवाचे कारण जातीपातीच्या लाटा असल्याचे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विकासकार्यातील योगदानाचे कौतुक केले.

Ranjitsinh Naik Nimbalkar
Ranjitsinh Naik NimbalkarSarkarnama
Published on
Updated on
  1. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी लोकसभा निवडणुकीतील पराभवाचे कारण जातीपातीच्या लाटांमध्ये शोधत, आपल्या कार्यक्षमतेवर भर दिला.

  2. त्यांनी सांगितले की, फलटण तालुक्यासाठी त्यांनी सचिन पाटील यांना आमदार म्हणून दिले आणि स्वतःसाठी नव्हे तर तालुक्यासाठी काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.

  3. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांप्रती कृतज्ञता व्यक्त करत, त्यांनी फलटणसाठी शेवटपर्यंत लढण्याचा “कातड्याचे जोडे” करण्याइतकं वचन दिलं.

Satara, 26 October : लोकसभा निवडणुकीत आमचा पराभव झाला. कारण तो काळ आमचा नव्हता. काम करण्यात आम्ही कुठेही कमी पडलो नाही. राज्यात काम करणाऱ्या हाताच्या बोटावर मोजणाऱ्या खासदारांमध्ये माझा समावेश होता. पण, दुर्दैवाने जातीपातीच्या लाटा आल्या, ‘चारशेपार’चा नारा आला आणि दुर्दैवाने मला घरी बसावं लागलं, अशी खंत माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी बोलून दाखवली.

सातारा जिल्ह्यातील फलटण (Phaltan) येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि कृतज्ञता मेळाव्यात माजी खासदार निंबाळकर बोलत होते. ते मला म्हणाले, लोकसभा निवडणुकीतील पराभावामुळे मी जरी घरी बसलो तरी या फलटण तालुक्याला तुमचा आमदार द्यावा, अशी तळमळ होती. सचिन पाटील यांच्या रुपाने आम्ही तुम्हाला आमदार देऊ शकलो. मी एकटा देऊ शकलो नाही, तर संपूर्ण तालुक्यातील जनता पाठीशी उभी राहिली.

मला माझ्या फलटणमधील जनतेने मोठे केले आहे. रणजितसिंह निंबाळकर (Ranjitsinh Naik Nimbalkar) कधीही मस्तीत वागला नाही. अधिकाऱ्यांना कधीही ब्र शब्द काढलेला नाही. आमच्याकडील काही लोक स्वतःला शहेनशाह समजतात. आमच्याकडची त्यांची जहॉगिरी गेली; पण त्यांची फुगिरी अजून गेलेली नाही. पुढून येणारे साप आहे की कुत्रं आहे, तो चावायला आला आहे की चाटायला हे आता आमच्या लक्षात येतंय. पण आम्ही कधीही ‘ब्र’ शब्द काढत नाही, असेही निंबाळकर यांनी स्पष्ट केले.

माजी खासदार म्हणाले, घाणेरड्या घटनेशी आमचं नाव जोडलं जातं. तेव्हा आमच्याही मनाला वेदना होतात. मलाही दोन मुली आहेत. या फलटण तालुक्यासाठी आम्ही शिपाई म्हणून काम करतो. पण, मला हिणवलं जातं. ह्याच्याकडं कुठलं पद आहे का. पण, जन्मभूमीचे पांग फेडण्यासाठी आपल्या सर्वांना काम करायचे आहे.


Ranjitsinh Naik Nimbalkar
Ranjitsinh Nimbalkar : साहेब, आम्हाला कोणाचाही बदला घ्यायचा नाही, तर.... : रणजितसिंह निंबाळकरांनी फडणवीसांसमोर मन मोकळे केले

रणजितसिंह निंबाळकर स्वतःसाठी तुमच्याकडे काहीही मागायला येणार नाही. पण जे मागेल ते माझ्या तालुक्यासाठी आणि जन्मभूमीसाठी मागेन. ‘कही लोग समंदर खंगालनेमें लगे आहे. हमारी कमिया ढुंढनेमे लगे आहे. उनकी खुदकी लंगोटी फटी हुई है और हमारे उपर किचट उछाडनमें लगे है’ असे कितीही प्रसंग येऊद्या, जोपर्यंत मन स्वच्छ आहे, तोपर्यंत अशा प्रसंगाला घाबरणार नाही, असा इशाराही त्यांनी विरोधकांना दिला.

रणजितसिंहांनी फडणवीसांना दिला हा शब्द

रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह येणार असल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द केले. पण, फलटणला तुम्ही मुद्दामहून आलात. फलटणला येण्याचे संकेत खूप काही सांगून जाणारं आहेत. खूप लोकांना दिशा देऊन जाणार आहे. फलटणसाठी ७० वर्षांत केवळ देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे, तुमचे उपकार माझ्यावर व माझ्या तालुक्यावर आहेत. त्यामुळे आमच्या कातड्याचे जोडे करण्याची वेळ आली तर हा रणजितसिंह मागे पुढे पाहणार नाही, एवढा शब्द देतो.


Ranjitsinh Naik Nimbalkar
CM Fadnavis announcement : महिला डाॅक्टर आत्महत्या प्रकरणात फलटणमधून CM फडणवीसांची मोठी घोषणा अन् माजी खासदार निंबाळकरांना क्लिन चिट

Q1. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मते त्यांच्या पराभवाचे कारण काय होते?
जातीपातीच्या लाटा आणि ‘चारशेपार’च्या घोषणांमुळे त्यांचा पराभव झाला.

Q2. त्यांनी फलटण तालुक्यासाठी काय केलं?
त्यांनी सचिन पाटील यांना आमदार म्हणून देत फलटणच्या विकासासाठी काम सुरू ठेवले.

Q3. त्यांनी स्वतःबद्दल कोणती भावना व्यक्त केली?
ते म्हणाले की, ते स्वतःसाठी काही मागत नाहीत; जे मागतील ते जन्मभूमीसाठी मागतील.

Q4. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना काय वचन दिलं?
फलटणसाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढण्याचं आणि “कातड्याचे जोडे” करण्याइतकं वचन दिलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com