Dhangar reservation Meeting
Dhangar reservation Meeting Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

मेंढपाळ बांधवांसाठी महिनाभरात एक मोठी योजना घोषित करणार : फडणवीसांची माहिती

संतोष आटोळे

इंदापूर (जि. पुणे) : धनगर समाज आरक्षण (Reservation) व समाजाच्या इतर योजनांच्या अंमलबजावणीबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याबरोबर आयोजित बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती धनगर ऐक्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. शशिकांत तरंगे यांनी दिली. तसेच, मेंढपाळ बांधवांसाठी देश पातळीवरची एक मोठी योजना येत्या महिनाभरात घोषित करू, असेही फडणवीस यांनी सांगितल्याचे तरंगे यांनी नमूद केले. (Devendra Fadnavis reassurance regarding Dhangar reservation)

धनगर आरक्षण प्रश्न जलसमाधी आंदोलनाच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्रालयामध्ये धनगर ऐक्य परिषदेच्या पदाधिकाऱ्यांबरोबर तातडीची बैठक आयोजित केली होती. त्यानंतर तरंगे यांनी ही माहिती दिली.

या बैठकीबाबत माहिती देताना डॉ. तरंगे म्हणाले की, धनगर समाजाच्या आरक्षणप्रश्नी आजच्या बैठकीत उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी गती देण्यासाठी सकारात्मकता दाखवली. तसेच, येत्या पाच ते सहा महिन्यांत याबाबत केलेली कार्यवाही दिसून येईल, असे आश्वासन दिले. त्याचबरोबर सरकारच्या वतीने धनगर समाजासाठी राबविण्यात येणाऱ्या २३ शासकीय योजना जानेवारीपर्यंत राज्यातील वाड्यावस्त्यांपर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही फडणवीस यांनी दिली आहे.

यशवंतराव होळकरांचे जन्मस्थळ असलेल्या वाफगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या ताब्यात असलेला वाडा सरकारच्य ताब्यात घेऊन त्यास राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल. तसेच, मेंढपाळ बांधवांसाठी देश पातळीवरची एक मोठी योजना येत्या महिनाभरात घोषित करू, असेही फडणवीस यांनी सांगितल्याचे तरंगे यांनी नमूद केले.

बैठकीत ठरल्याप्रमाणे जानेवारीपर्यंत केलेल्या घोषणांची अंमलबजावणी झाली नाही तर पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा तरंगे यांनी दिला. दरम्यान या बैठकीसाठी धनगर ऐक्य परिषदेचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासह इंदापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक तय्यब मुजावर, सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर धनवे उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT