Devendra Fadnavis, Jayant Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Devendra Fadnavis Video : जयंत पाटलांचा भाजप प्रवेशाचा विषय CM फडणवीसांनी कायमचा संपवला, म्हणाले,'आमच्या मंत्रिमंडळात...'

Devendra Fadnavis Jayant Patil BJP : जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशाबाबत चर्चा होत असतात. मात्र, देवेंद्र फडणवीसांनी नाव न घेता ईश्वारपूरमध्ये मोठे भाष्य केले आहे.

Rahul Gadkar

Devendra Fadnavis News : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष, आमदार जयंत पाटील यांच्या भाजपमध्ये प्रवेश करण्यासंदर्भात सतत चर्चा होत असते. भाजप नेत्यांकडून पाटील भाजपमध्ये येण्यास उत्सुक असल्याचे सांगितले जाते. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जयंत पाटलांच्या भाजप प्रवेशाबाबतचा विषय कायमचा संपवला

जयंत पाटील यांच्या होमपीच उरण-ईश्वरपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने सभा घेतली. या सभेत पाटील यांच्या संभाव्य भाजप पक्षप्रवेशाच्या चर्चेवर कायमचा पूर्णविराम त्यांनी दिला. इतकेच नव्हे तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी खोचक टोला लगावत म्हटले की, आपल्या पक्षात कुणासाठीही आता जागा नाही.

भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांनी आमदार जयंत पाटील यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाच्या चर्चेवर भाष्य केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस त्यांनी हाच मुद्दा लक्षात ठेवून त्याला प्रत्युत्तर दिले आहे.

ते म्हणाले, 'मी इथे विकासाचा कार्यक्रम बोलायला आलो आहे. कुणावर टीका करणार नाही. फक्त कुणी संभ्रमात राहू नये म्हणून बोलतो आहे की, माझ्याकडे मंत्रिमंडळात कोणतीही जागा शिल्लक नाही. स्टेजवरच्या कुणी मंत्री होण्याची मागणी करूच नये, बाहेरून येऊन मंत्री होण्याचा तर विषयच नाही.'

ईश्वरपूर शहरवासीयांची ईश्वरपूर नामांतराची 172 वर्षांची मागणी आम्ही पूर्ण करून शहरातील नागरिकांच्या भावनांचा आदर केला आहे. आता उरुण-ईश्वरपूरही केले आहे. शहरासाठी भुयारी गटर योजना, 24 बाय 7 पाणी योजनेच्या कामाला मंजुरी दिली आहे. निवडणुकीनंतर ही कामे करून शहर राज्यात आदर्श करण्यासाठी प्रयत्न करू, तुम्ही जे मागितले ते दिले. आता आमची मागायची वेळ आहे, त्यामुळे महायुतीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार विश्वनाथ डांगे व नगरसेवकपदाच्या सर्व उमेदवारांना विजयी करा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT