BJP VS Eknath Shinde : दोन नंबरला किंमत नाही, एकनाथ शिंदेंना भाजपने डिवचले; रवींद्र चव्हाण नको नको ते बोलले

Ravindra Chavan Local body Election : सांगली जिल्ह्यात नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या प्रचारात रवींद्र चव्हाण यांनी दोन नंबरला काही किंमत नसते, असे वक्तव्य करत शिवसेनेवर निशाणा साधला.
Ravindra Chavan Eknath Shinde
Ravindra Chavan Eknath ShindesarkarnamRavindra Chavan Eknath Shindea
Published on
Updated on

Ravindra Chavan News : स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात होत असलेल्या नगरपरिषद, नगपंचायत निवडणुकीच्या मतदानाला अवघा एक दिवस बाकी असताना शिवसेना आणि भाजपमधील नेत्यांमधील मतभेद पुन्हा पुढे येताना दिसत आहेत. सांगोल्याचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या कार्यालयावर ईडीने छापा मारला आहे. त्यात हिंगोलीत भाजप शिवसेना आमदार एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. त्यातच भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या नव्या वक्तव्यामुळे महायुतीमध्ये सर्व अलबेल नसल्याची चर्चा आहे.

सांगलीमध्ये प्रचारासाठी सभा घेणाऱ्या रवींद्र चव्हाणांनी एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता एक नंबर हा एकनंबर असतो. दोन नंबरला काही किंमत नसते, असे वक्तव्य केले. तसेच यासाठी आर आर पाटील यांच्या भाषणाचा संदर्भ दिला. दोन नंबरला काही किंमत नसते, असे चव्हाण यांनी बोलताच कार्यकर्त्यांनी मोठा प्रतिसाद देत टाळ्यांचा कडकडाट केला.

रवींद्र चव्हाण म्हणाले, 'आर आर पाटील आपल्यामध्ये नाहीत. मात्र, ते सभागृहात असताना 2014 मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर ते आपल्या भाषणात म्हणाले होते की, दोन नंबरला काही किंमत नसते मी नेहमी नंबर एक होण्याचा प्रयत्न केला. चव्हाण पुढे म्हणाले की, आर आर पाटील यांच्या त्या भाषणाचा व्हिडिओ अजुनही व्हायरल होतो. त्यांच्या वक्तव्याचे अनेक साथीदार आहेत.

Ravindra Chavan Eknath Shinde
Nagarpanchayat Election Stay : 'मतदानाच्या एक दिवस आधी स्थगिती, डोकं ठिकाणावर...', एकनाथ शिदेंच्या शिलेदार प्रचंड चिडला

जो भी है देवाभाऊ...

जो भी है वो देवाभाऊ है, देवाभाऊ सबका भाऊ है. यह आप सब लोगों को जा के बताओ, असे हिंदीत आवाहन देखील भाजप कार्यकर्त्यांना रवींद्र चव्हाण यांनी केले. तसेच राजकारण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला मंत्र सबका का साथ सबका विकास आपण लक्षात ठेवायला हवा, असे देखील त्यांनी सांगितले.

Ravindra Chavan Eknath Shinde
Ajit Pawar: अजितदादांचा पोलिसांना गर्भित इशारा; तीन पक्षांचे सरकार आहे हे लक्षात ठेवा!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com