Devendra Fadanvis, Udayanraje Bhosale, Shivendraraje Bhosale Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Karad Political News: दोन्ही राजांच्या वादावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, काही गंभीर घडलेले नाही

Fadnavis On Udayanraje - Shivendraraje Bhosale Dispute: खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस कराड येथे येऊन त्यांची स्वतंत्रपणे भेट घेतली.

Umesh Bambare-Patil

-हेमंत पवार

Karad BJP News : साताराच्या दोन्ही राजंशी चर्चा झाली विकास कामासंदर्भात त्यांनी काही निवेदने ही दिली आहेत. विशेषता विकास कामासंदर्भात विस्तृत चर्चा आज झाली. वादाचे म्हणाल तर अशा गोष्टी कधी कधी होत असतात. पण, तिथे असे काही गंभीर घडलेले नाही की ते फार अडचणीचे आहे, अशी टिप्पणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही राजांतील वादावर केली.

सातारा बाजार समिती इमारतीच्या भूमिपूजनावरून काल सातारा येथे झालेल्या राड्याप्रकरणी खासदार उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale व आमदार शिवेंद्रसिंहराजे Shivendraraje Bhosale भोसले एकमेकांसमोर आले होते. त्यामुळे वातावरण तंग झाले होते. दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadanvis काल बुधवारपासून कराड दौऱ्यावर आहेत.

खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी कराड येथे येऊन उपमुख्यमंत्री फडणवीस यांची स्वतंत्रपणे भेट घेतली. सुमारे तासभर स्वतंत्ररित्या झालेल्या या चर्चेत सातारा येथील राड्याची चर्चा झाल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. त्यावर उपमुख्यमंत्री फडणवीस यांना विचारले असता त्यांनीही प्रतिक्रिया दिली.

फडणवीस म्हणाले, साताराच्या दोन्ही राजांशी चर्चा झाली. विकास कामासंदर्भात त्यांनी काही निवेदने ही दिली आहेत. विशेषता विकास कामासंदर्भात विस्तृत चर्चा झाली.दोन्ही राजांना जनतेचे प्रश्न महत्त्वाचे वाटत आहेत. त्यांना जनतेचे प्रश्न मांडायचे आहेत. वादाचे म्हणाल, तर अशा गोष्टी कधी कधी होत असतात. पण असे नाही की तिथे काही गंभीर घडले आहे. अशा गोष्टी होत असतात ते फार अडचणीचे आहे असे नाही, अशी टिप्पणी त्यांनी केली .

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT