Solapur, 08 June : देशात लोकशाही आहे, त्यामुळे प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. माजी आमदार राजेंद्र राऊत यांचं अकलूजमध्ये स्वागत आहे. त्यांनी लोकशाही मार्गानं यावं. त्यांना जे करावं वाटतंय, ते करावं, त्याला आमची ना नाही. अकलूज नेहमी सर्वांचं स्वागत करतं, अशा उपरोधिक शब्दांत खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्यावर पलटवार केला.
विधान परिषद निवडणुकीत विजयी झाल्यानंतर पहिली सभा अकलूजच्या विजय चौकात घेऊन मोहिते पाटील यांना उत्तर देणार आहे, असे महायुतीचे उमेदवार माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी म्हटले होते, त्याला खासदार मोहिते पाटील यांनी उत्तर दिले आहे.
मोहिते पाटील म्हणाले, देशात लोकशाही आहे. माजी आमदार राजेंद्र राऊत यांचं अकलूजमध्ये स्वागत आहे. अनेक मोठ्या नेत्यांच्या सभा विजय चौकात सभा झाल्या आहेत. अकलूज हे मोठ्या विचारांचे शहर आहे. लोकशाही मार्गानं त्यांनी यावं. त्यांना जे करावं वाटतंय त्यांनी करावं, त्याला आमची ना नाही.
यापूर्वी (स्व.) प्रमोद महाजन, ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांचीही अकलूजमध्ये सभा झालेली आहे. त्यामुळे अकलूजला ही गोष्ट नवी नाही. अनेक पक्षांचे लोक अकलूजमध्ये येऊन सभा गाजवून गेले आहेत. त्यात आमच्या बाजूचे किंवा विरोधातील असतील, अकलूजने नेहमी सर्वांचं स्वागत केलं आहे, असेही धैर्यशील मोहिते पाटील यांनी स्पष्ट केले.
भारतीय जनता पक्षाकडे पाशवी बहुमत असतानाही ते एवढं का पळताहेत. घाबरून गेले आहे की काय, असा सवाल करून मोहिते पाटील म्हणाले, मी एमआयएमसह सर्व पक्षाच्या लोकांना भेटतोय, सर्व नगरसेवक आपल्या व्यथा मांडत आहेत. सर्व पक्षीय नगरसेवकांसोबत आमच्या सकारात्मक बैठका होत आहेत. त्यांच्याकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.