Dhairyasheel Mohite Patil-Ranjitshinh Naik Nimbalkar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Lok Sabha Nivadnuk Nikal 2024 LIVE : माढ्यातून तिसऱ्या फेरी अखेर धैर्यशील मोहिते पाटील 9000 मतांनी आघाडीवर

Vijaykumar Dudhale

Solapur, 04 June : माढा लोकसभा निवडणुकीच्या अटीतटीच्या लढतीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे धैर्यशील मोहिते पाटील हे आघाडीवर असल्याची माहिती आहे. माेहिते पाटील हे पोस्टल आणि ईव्हीएममधील मतमोजणीत आघाडीवर आहेत. तिसऱ्या फेरी अखेर धैर्यशील मोहिते पाटील हे त्यांचे प्रतिस्पर्धी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यापेक्षा सुमारे ९००० मतांनी आघाडी घेतल्याची माहिती आहे.

भाजपचे उमेदवार विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पोस्टल मतदानात सुरुवातीला आघाडी घेतली होती. मात्र, मतमोजणी जसजशी पुढे गेली, तसतसे मोहिते पाटील यांनी माढ्यातून तब्बल 9000 मतांची आघाडी घेतल्याची माहिती आहे. तिसऱ्या फेरी अखेर धैर्यशील मोहिते पाटील हे त्यांचे निंबाळकर यांच्यापेक्षा सुमारे ९००० मतांनी आघाडी घेतली आहे. माढा लोकसभा मतदारसंघातील फलटण वगळता पहिल्या फेरीअखेर पाच मतदार संघातून धैर्यशील मोहिते पाटील आघाडीवर असल्याची माहिती आहे.

माढ्यात सुरुवातील पोस्टल मतांची मोजणी करण्यात आली. माढा लोकसभा मतदारसंघात सहा हजार 971एवढे पोस्टल मतदान झाले असून 26 टेबलवर मतमोजणी झाली आहे. त्याकरिता 130 कर्मचाऱ्यांनी काम पाहिले. आता माढ्यातील ईव्हीएम मशिनमधील मतांची मोजणी सुरू झाली आहे.

माढा लोकसभा मतदारसंघ भाजपसाठी सर्वाधिक सुरक्षित असतानाही उमेदवारीमध्ये झालेल्या गोंधळातून भाजपची ही सीट धोक्यात आल्याचे दिसून येत आहे. माढा मतदारसंघातून मोहिते पाटील हे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते.

भाजपने विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना पुन्हा एकदा माढ्यातून लोकसभेच्या रिंगणात उतरवले होते. मात्र मोहिते पाटील यांनी बंडखोरी करत शरद पवार यांच्या पक्षाकडून लोकसभा निवडणूक लढवली आणि त्यात तिसऱ्या फेरी अखेर धैर्यशील मोहिते पाटील हे तब्बल 9000 मतांनी आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT