Prataprao Jadhav Lok Sabha 2024 Results LIVE : बुलडाण्यातून शिंदेंचा शिलेदार आघाडीवर...

Prataprao Jadhav is leading in the counting of votes in Buldana constituency: शिवसेनेत झालेल्या एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर लोकसभा निवडणुकीत अनेक ठिकाणी शिंदेंची शिवसेना विरुद्ध ठाकरेंची शिवसेना अशी लढत होत आहे. यामध्ये बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचाही समावेश आहे.
Prataprao Jadhav
Prataprao JadhavSarkarnama

Buldana Lok Sabha Election Result 2024 Live: राज्यातील अत्यंत चुरशीची ठरलेल्या आणि शिवसेना ठाकरे विरुद्ध शिवसेना शिंदे असा थेट सामना झालेल्या, बुलडाणा मतदारसंघातील मतमोजणीत पहिल्या तीन फेरीचा कल शिंदेच्या शिवसेनाच्या बाजूने असल्याचं समोर येत आहे. कारण लोकसभा निवडणुकीच्या सुरुवातीच्या मतमोजणीत तरी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार प्रतापराव जाधव आघाडीवर असल्याचा कल आला आहे. तर ठाकरेंच्या शिवसेनेचे नरेंद्र खेडेकर पिछाडीवर आहेत.

शिवसेनेत (Shivsena) झालेल्या एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर लोकसभा निवडणुकीत अनेक ठिकाणी शिंदेंची शिवसेना विरुद्ध ठाकरेंची शिवसेना अशी लढत होत आहे. यामध्ये बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचाही समावेश आहे. या मतदारसंघात महायुतीकडून शिंदेंच्या शिवसेनेचे प्रतापराव जाधव यांना उमेदवारी दिली होती. तर आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाने नरेंद्र खेडेकर यांना मैदानात उतरवलं होतं.

अशातच आता या मतदारसंघात नेमका कोणाचा विजय होणार याची उत्सुकता अनेकांना लागून राहिली होती. सध्यातरी या मतदारसंघाचा कौल शिंदेच्या शिवसेनेकडून असल्याचं पाहायला मिळत आहे. जाधव हे आघाडीवर असले तरी फायनल निकाल हाती यायला आणखी काही तास वाट पाहावी लागणार आहे.

Prataprao Jadhav
Dharashiv Lok Sabha Election 2024 : ओमराजेंनी राणादादांना दोनदा पाडलं; तिसऱ्या खेपेला राणादादा भारी ठरणार?

तुपकरांमुळे वाढलं आघाडी-युतीचं टेन्शन

बुलडाण्यातील निवडणूक ‘निष्ठावंत विरुद्ध गद्दार’ या अंगाने पाहिलं जात होतं. शिवसेना जिल्हाप्रमुख नरेंद्र खेडेकर आणि शिंदेसेनेचे प्रतापराव जाधव यांच्यात हा सामना रंगला आहे. अशातच रविकांत तुपकरांनी या निवडणुत उडी घेतल्यामुळे हा सामना चुरशीचा होणार असल्याचं स्पष्ट झालं होतं. त्यामुळे तुपकरांच्या 'एन्ट्री' मुळे आघाडी-युतीचं टेन्शन वाढलं होतं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com