Dhairyasheel Mohite Patil : Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Dhairyasheel Mohite Patil : मोहिते पाटील घराण्यातील चौथ्या खासदाराने मराठीतून घेतली शपथ

Vijaykumar Dudhale

Solapur, 25 June : माढा लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे धैर्यशील मोहिते पाटील पराभवाची धूळ चारली. मोहिते पाटील घराण्यातील चौथे खासदार ठरलेल्या धैर्यशील यांनी आज मराठीतून खासदारकीची शपथ घेतली.

सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्यानंतर माढ्याचे (Madha) खासदार धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) यांनी आज लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. मी ‘धैर्यशील उर्मिला राजसिंह मोहिते पाटील’ अशी सुरुवात करत मोहिते पाटील यांनी परमेश्वराला स्मरून शपथ घेतली.

धैर्यशील मोहिते पाटील हे माढ्यातून भाजपकडून लोकसभेची निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक होते. मात्र, भाजपने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना तिकिट दिले हेाते. त्यावेळी मोहिते पाटील हे बंडखोरी करतील का, अशीच शंका उपस्थित केली जात होती. मात्र, मोहिते पाटील यांनी बंडखोरीचे धाडस करून शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश केला आणि माढ्यातून निवडणूक लढवली.

माढ्यातून धैर्यशील मोहिते पाटील यांनी नाईक निंबाळकर यांना तब्बल सव्वा लाख मतांनी पराभूत केले होते. माढ्यातून निवडणूक जिंकलेले धैर्यशील हे मोहिते पाटील घराण्यातील चौथे खासदार ठरले आहेत. यापूर्वी धैर्यशील यांचे काका माजी राज्यमंत्री प्रतापसिंह मोहिते पाटील हे सोलापूर लोकसभा मतदारसंघातून 2003 च्या पोटनिवडणुकीत निवडून आले होते.

प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्यानंतर रणजितसिंह मोहिते पाटील हे राष्ट्रवादीकडून राज्यसभेवर निवडून आले होते. सुप्रिया सुळे यांची लोकसभेवर निवड झाल्यानंतर त्या जागी रणजितसिंह मोहिते पाटील यांना संधी देण्यात आली होती. त्यानंतर शरद पवार यांच्यानंतर 2014 मध्ये मोदी लाटेही माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील हे माढ्यातून खासदार म्हणून निवडून आले होते.

विजयसिंह मोहिते पाटील यांनी गेल्या निवडणुकीत भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र, भाजपने मोहिते पाटील यांच्याऐवजी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिली होती. मागील निवडणुकीत निंबाळकर निवडून आले हेाते. त्यानंतर 2024 मध्ये माढ्यातून धैर्यशील मोहिते पाटील यांनी निंबाळकरांना धूळ चारत खासदारकीची निवडणूक जिंकली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT