Praniti Shinde : ‘मैं प्रणिती सुशीलकुमार शिंदे...’ : संविधान हाती घेत प्रणितींनी घेतली हिंदीतून खासदारकीची शपथ

Lok Sabha Member Oath : प्रणिती शिंदे यांचे नाव पुकारताच त्यांनी प्रथम काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याशी हस्तांदोलन केले, त्यानंतर त्यांनी शपथ घेतली.
Praniti Shinde
Praniti ShindeSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 25 June : सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांनी आज (ता. 25 जून) खासदारकीची शपथ घेतली. त्यांनी संविधान हातात घेत हिंदीतून लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेतली, त्यामुळे प्रणिती शिंदे यांनी घेतलेली शपथ विशेष लक्षवेधी ठरली आहे.

नवनिर्वाचित लोकसभा सदस्यांना सोमवारपासून (ता. 24 जून) खासदारकीची शपथ देण्यात येत आहे. त्यात आज सोलापूरमधून (Solapur) निवडून आलेल्या प्रणिती शिंदे (Praniti shinde) यांनी आज लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. प्रणिती शिंदे यांचे नाव पुकारताच त्यांनी प्रथम काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्याशी हस्तांदोलन केले, त्यानंतर त्यांनी शपथ घेतली.

प्रणिती शिंदे यांनी हिंदीतून लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. या वेळी त्यांच्या हाती संविधानाची प्रत होती. ‘मैं प्रणिती सुशीलकुमार शिंदे...’ अशी सुरुवात करत लोकसभेत प्रथमच निवडून आलेल्या प्रणिती यांनी खासदारकीची शपथ घेतली. शपथ पूर्ण झाल्यानंतरही त्यांनी जय महाराष्ट्र अन्‌ जय संविधानचा नारा दिला.

संसदेत पोचताच प्रणिती शिंदे भावूक झाल्या...

सोलापूरमधून प्रथमच निवडून आलेल्या प्रणिती शिंदे या सोमवारी लोकसभा सभागृहात आल्या होत्या. संसदेत पोचल्यानंतर त्या काहींशा भावूक झाल्या होत्या. संसदेच्या पायऱ्या चढतानाचा क्षण खूप भावनिक होता. जुने संसद भवन असायला हवे होते. कारण ते खूप ऐतिहासिक होते, असेही त्यांनी म्हटले होते.

Praniti Shinde
Bhaskar Bhagare Politics : राष्ट्रवादीच्या खासदाराने संसदेतही दिली प्रचारातील घोषणा, मात्र फक्त अर्धी!

लोकशाहीच्या मंदिरात हे माझे पहिले पाऊल होते, त्यामुळे खूप भावनिक झाले होते. देशसेवा करत असल्याचा गर्व वाटला. लोकांची सेवा करण्याचा प्रयत्न राहील. महाराष्ट्रात तीन टर्म आमदार होते. आता माझी खासदारकीची पहिलीच टर्म आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले होते.

सोलापुरात रोखला भाजपचा विजय रथ

सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांनी भाजपचे राम सातपुते यांचा सुमारे 74 हजार मतांनी पराभव केला आहे. गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत सोलापूरमधून भाजपचे दोन खासदार निवडून आले होते. त्यात प्रणिती शिंदे यांचे पिताश्री सुशीलकुमार शिंदे यांचा सलग दोन निवडणुकीत पराभव झाला होता. भाजपची विजयाची हॅट्‌ट्रीक रोखत सुशीलकुमार शिंदे यांच्या पराभवाचे प्रणिती यांनी उट्टे काढले होते.

Praniti Shinde
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; काँग्रेसने उमेदवार उतरवला...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com