Uttam Jankar-Dhairyasheel Mohite Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Mohite Patil Family : धैर्यशील मोहिते पाटलांचे निर्णय त्यांच्या कुटुंबातील लोक फिरवतात, टिकू देत नाहीत : उत्तम जानकरांचा गौप्यस्फोट

Uttam Jankar Statement : आमदार उत्तम जानकर यांनी मोहिते पाटील कुटुंबातील निर्णय प्रक्रियेवर भाष्य करत अनेक सत्ताकेंद्रे असल्याचा दावा केला असून राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

Vijaykumar Dudhale

Solapur, 12 June : मोहिते पाटील कुटुंबात निर्णय कोण करतंय, हेच समजत नाही. त्यांच्या कुटुंबात अनेक सत्ताकेंद्रे आहेत. खासदार धैर्यशील मोहिते पाटील पुढे होऊन निर्णय घेतात. पण, त्यांचा निर्णय फिरविणारी त्यांच्याच कुटुंबात यंत्रणा आहे. त्यांचे निर्णय कुटुंबातील लोक टिकू देत नाहीत, असा गौप्यस्फोट माळशिरसचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांनी केला.

आमदार उत्तम जानकर यांनी विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर त्यांनी मोहिते पाटील यांच्या कुटुंबावर शरसंधान करत अनेक गोष्ट उजेडात आणल्या आहेत.

ते म्हणाले, मोहिते पाटील कुटुंबात कोण निर्णय करतंय, हेच समजत नाही. खासदार धैर्यशील मोहिते पाटील पुढे होऊन निर्णय घेतात. पण, त्यांचा निर्णय फिरविणारी मागं यंत्रणा आहे. राजकारण करताना प्रत्येक ठिकाणी न्याय द्यावा लागतो. निवडणुकीची व्यूहरचना करावी लागते, आघाड्या कराव्या लागतात, हे सर्व आपण ठरवलं तर पाठीमागं पुन्हा वेगळ्याच घडामोडी होतात. प्रत्येक वेळी ठरवलेला प्लॅन, व्यूहरचना ही उद्‌ध्वस्त केली जाते.

मोहिते पाटील कुटुंबात एकत्रितपणाच्या निर्णयाचा अभाव झालेला आहे. निर्णय करणारी अनेक केंद्रे त्यांच्या कुटुंबात आहेत, त्यामुळे निर्णय होत नाहीत आणि केलेला निर्णय पुन्हा बदलला जातो, असे वारंवार घडत असल्यामुळे राजकीय नुकसान होत आहे, असे उत्तम जानकर यांनी नमूद केले.

ते म्हणाले, मोहिते पाटील कुटुंबात अनेक सत्ताकेंद्रे आहेत. खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचे निर्णय बऱ्याच वेळा रास्त असतात. पण त्यांचे कुठलेच निर्णय ठेवले जात नाहीत, बिघडवले जातात. फिरवले जातात. हे सातत्याने घडत आहे, त्यामुळेच राजकारणात नुकसान होऊ लागले आहे. सगळ्या आमदारांनी वेगवेगळ्या भूमिका घेतल्या आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या वेळी मी दिलेला शब्द पाळण्यासाठी जीवावर उदार होऊन विमानातून उडी टाकून आलो होतो, तरीसुद्धा मी आमदार होऊ नये; म्हणून त्यांच्या कुटुंबातील लोकांनी जर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाऊन माझा जातीचा दाखला रद्द करा, अशा पद्धतीची मानसिकता असेल तर ते चुकीचे आहे, असेही आमदार उत्तम जानकर यांनी नमूद केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT