Shivsena Dispute : चंद्रकांत जाधव भडकले : ‘6 महिन्यांपूर्वी शिवसेनेत आलेले संजीवराजे, चंद्रहार आमच्या मुलाखती घेणार का?’

Chandrakant Jadhav upsate : शिवसेनेतील पदाधिकारी निवडीच्या प्रक्रियेवर चंद्रकांत जाधव यांनी आक्षेप घेत पक्षासाठी दशकांपासून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मुलाखतींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
Sanjivraje Naik Nimbalkar- chandrahar patil-Chandrakant Jadhav
Sanjivraje Naik Nimbalkar- chandrahar patil-Chandrakant JadhavSarkarnama
Published on
Updated on

Phaltan, 12 June : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत पदाधिकारी निवडीवरून वादाची ठिणगी पडली आहे. इच्छुकांच्या मुलाखती घेऊन नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी केल्या जाणार आहेत. त्याला शिवसेनेत अनेक वर्षे काम करणाऱ्या चंद्रकांत जाधवांसारख्या पदाधिकाऱ्यांनी विरोध दर्शविला आहे. तब्बल ३०-३० वर्षे पक्षासाठी झटणाऱ्यांच्या मुलाखती ६ महिन्यांपूर्वी पक्षात आलेले लोक घेणार का? असा सवाल करत जाधव यांनी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, माढा लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख चंद्रहार पाटील यांच्यावर निशाणा साधल्याचे मानले जात आहे.

शिवसेना नेतृत्वाने मागील महिन्यांत शिवसेनेची कार्यकारिणी बरखास्त केली होती. त्यानंतर आता मुलाखतींच्या माध्यमातून नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी केल्या जाणार आहेत. त्या कार्यपद्धतीला पक्षातील जुन्या नेत्यांना विरोध दर्शविला आहे.

शिवसेनेने माढा लोकसभा मतदारसंघातील फलटण आणि माण- खटाव विधानसभा मतदारसंघातील शाखाप्रमुख ते जिल्हाप्रमुख पदाच्या निवडीसाठी शिवसैनिकांच्या मुलाखती घेण्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवड प्रक्रियेवरून या दोन्ही मतदारसंघात ठिणगी पडली आहे.

पदाधिकारी निवडीसाठीच्या मुलाखती जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, माढा लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख चंद्रहार पाटील, सातारा जिल्हा संपर्कप्रमुख शरद कणसे व महिला आघाडीच्या संपर्क प्रमुख रेश्मा जगताप हे या मुलाखती घेणार आहेत. मात्र, अनेक वर्षे शिवसेनेचे काम करणारे ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांचा आत्मसन्मान दुखावणारी मुलाखतीचा प्रक्रिया आहे.

मुलाखती घेणाऱ्यांच्या नावालाही ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांचा आक्षेप आहे. त्यात लढाऊ शिवसैनिक म्हणून ओळख असणारे विद्यमान जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव यांचा समावेश आहे. त्यांनी या निवड प्रक्रियेला तीव्र विरोध करत नाराजी दर्शविली आहे.

Sanjivraje Naik Nimbalkar- chandrahar patil-Chandrakant Jadhav
Nashik MLC Election : गोकुळ गिते केव्हाही करु शकतात चमत्कार, दराडेंना शेवटपर्यंत ती एक भीती राहणार

सर्वांत महत्वाची गोष्ट म्हणजे चंद्रकांत जाधव यांच्या पुढाकारातून फलटणच्या राजे गटाचा शिवसेनेत प्रवेश झाला आहे. आता चंद्रकांत जाधव यांनाच पदावर ठेवायचे की नाही, हे संजीवराजे ठरवणार आहेत. सहा महिन्यांपूर्वी शिवसेनेत आलेले संजीवराजे, रेश्मा जगताप आणि चंद्रहार पाटील हे ३० वर्षांपासून पक्षासाठी कार्यरत असलेल्यांची मुलाखत घेणार का? असा सवाल चंद्रकांत जाधव यांनी केला आहे.

दरम्यान, चंद्रकांत जाधव यांनी मुलाखतींच्या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक उद्या (शनिवारी ता. १३ जून) सायंकाळी साताऱ्यात बोलावली आहे. जिल्ह्यातील सर्व आजी-माजी पदाधिकारी व शिवसैनिकांनी या बैठकीस उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

मुलाखती फलटणमध्ये होणार

फलटण आणि माण-खटाव मतदारसंघातील शाखा प्रमुख ते जिल्हा प्रमुख पदांसाठी इच्छुक शिवसैनिकांच्या मुलाखती येत्या रविवारी (ता. १४ जून) कोळकी येथील अनंत मंगल कार्यालयात होणार आहेत, अशी माहिती जिल्हा संपर्क प्रमुख शरद कणसे यांनी दिली आहे. जिल्हा संपर्क प्रमुख शरद कणसे, माढा लोकसभा मतदारसंघ संपर्क प्रमुख चंद्रहार पाटील, संजीवराजे नाईक निंबाळकर आणि सातारा जिल्हा संपर्क प्रमुख रेश्मा जगताप हे इच्छुकांच्या मुलाखती घेणार आहेत.

Sanjivraje Naik Nimbalkar- chandrahar patil-Chandrakant Jadhav
Prashant Paricharak : महायुतीच्या बैठकीला माजी आमदार प्रशांत परिचारकांची ‘या’ कारणामुळे गैरहजेरी!

फलटण तालुक्यातील मुलाखती रविवारी सकाळी अकरा ते साडेबारा होतील. दुपारी साडेबारा ते दोन यावेळेत माण-खटाव तालुक्यातील मुलाखती होणार आहेत. इच्छुक शिवसैनिकांनी मुलाखतींना वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन कणसे यांनी केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com